कोण होणार आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (फोटो- टीम नवराष्ट्र)
कोण होणार आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ
अभिषेक शर्मा व कुलदीप यादवमध्ये टक्कर
सप्टेंबरमहिन्यासाठी होणार घोषणा
Abhishek Sharma Vs Kuldeep Yadav: नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे. या स्पर्धेत भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे आयसीसीने या दोन्ही खेळाडूंची नावे ‘आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ साठी जाहीर केली आहेत.
कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांना चांगल्या प्रदर्शन केल्यामुळे ‘आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी सप्टेंबर महिन्यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे नाव देण्यात आले आहे. यामध्ये झिम्बांब्वेच्या ब्रायन बेनेटचे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
भारताचा आक्रमक गोलंदाज अभिषेक शर्माने विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २०२५ मधील आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्माने एकूण ३१४ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने तीन अर्धशतके देखील लगावली. २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावावर झाला आहे.
टी-२० मध्ये अभिषेक शर्मा आघाडीवर
अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आहे. त्याने अनेकदा तुफानी खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. अभिषेक शर्मा ९३१ धवा करून टी-२० मध्ये टॉपला आहे. तर भारताचा चतुर फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचे नामांकन देखील आयसीसीने केले आहे. कुलदीप यादवने आशिया कप स्पर्धेत १७ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स कुलदीप यादवने घेतल्या आहेत.
ENG W vs BAN W : पहिल्या विजयानंतर इंग्लड आणि बांग्लादेश येणार आमनेसामने! कोणाच्या नशीबी दुसरा विजय?
पहिल्या विजयानंतर इंग्लड आणि बांग्लादेश येणार आमनेसामने
आज बांगलादेश महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात रंगणार आहे. बांगलादेशी संघाने या विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे पहिल्याच सामन्यात त्यांनी पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून विजयी सुरुवात केली आहे. तर इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या सामन्यात निस्तानाभूत केले होते. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ६९ धावांत गुंडाळले आणि १० विकेटने विजय मिळवला. तथापि, गुणवत्ता आणि उपलब्ध पर्यायांचा विचार केला तर, इंग्लंड त्यांच्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच पुढे आहे. टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स, हीदर नाईट, नॅट सायव्हर-ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल आणि सोफिया डंकले सारख्या प्रतिभावान खेळाडूंसह, इंग्लंड एक मजबूत संघ असल्याचे दिसून येते.