फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या जर्सीवर परतला. मालिकेतील त्याची कामगिरी प्रभावी होती, त्याने तीन सामन्यांमध्ये २०२ धावा केल्या. त्याने एक अर्धशतक आणि एक शतकही झळकावले. या दमदार कामगिरीमुळे तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर १ वर पोहोचला.
न्यूझीलंडचा स्टार डॅरिल मिशेल त्याला मागे टाकून नंबर १ झाला होता. आता, रोहितने एकही सामना न खेळता त्याला मागे टाकले आहे आणि नंबर १ स्थान परत मिळवले आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारी अलिकडेच अपडेट करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकावर असलेला रोहित शर्मा आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुखापतीमुळे मिशेल वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला होता आणि पुढचा सामना खेळू शकला नव्हता.
🚨 ROHIT SHARMA BECOMES NO.1 ODI BATTER IN THE WORLD IN ICC RANKINGS 🚨 – The Hitman at the Top..!!!! 🐐 pic.twitter.com/qtlG9t5SMY — Tanuj (@ImTanujSingh) November 26, 2025
रोहित शर्मा आता एकदिवसीय क्रमवारीत ७८१ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर डॅरिल मिशेल ७६६ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की चार भारतीय फलंदाज (Rohit Sharma, Shubman GIll, Virat Kohli And Shreyas Iyer) टॉप १० यादीत आहेत. टीम इंडियाने टी20 मालिकेमध्ये आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. पण कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे भारताच्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष देण्याची गरज आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. आता त्यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. ही एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रांची येथे सुरू होईल. रोहित शर्मा येथे पुन्हा मैदानात उतरताना दिसेल. मालिकेच्या तयारीसाठी विराट कोहलीही रांची येथे पोहोचला आहे आणि रोहित शर्माही लवकरच तिथे येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितने प्रभाव पाडला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो धावा करत राहील अशी अपेक्षा आहे.






