टी 20 क्रिकेट आणि आयसीसी नियम (फोटो-सोशल मीडिया)
International T20 Cricket ICC Rule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील बदलांबाबत काही काळापासून बरीच चर्चा होत आली आहे. अशातच आता आयसीसीने टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये पॉवरप्लेबाबत एक नवीन नियम लागू होणार असल्याचे जाहीर केला आहे. सामन्यातील षटके कमी झाल्यास हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.
या नियमामध्ये, जर फलंदाजी करणाऱ्या संघाचे षटके कमी असतील तर पॉवरप्लेचे षटके कमी केले जाणार आहे. साधारणपणे २० षटकांच्या टी२० सामन्यात ६ षटकांचा पॉवरप्ले असतो. जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामन्यातील षटके कमी करण्यात आली असतील तर अशा परिस्थितीत पॉवरप्लेची षटके किंवा चेंडूंची संख्या कमी केली जाणार.
हेही वाचा : क्रिकेट मैदानावर आता पंचांचा बोलबाला! ICC कडून स्लो ओव्हर रेटचा सामना करण्यासाठी ‘हा’ नियम जारी..
आयसीसीच्या नवीन नियमानुसार, जर टी२० सामना १९ षटकांचा असेल तर अशा वेळी पॉवरप्लेचे षटके ५.४ केले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक षटकानुसार पॉवरप्लेच्या षटकांची संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेण्यातआला आहे. यापूर्वी असा नियम होता की, जर एखादा संघ ८ षटकांसाठी फलंदाजी करत असेल तर अशा परिस्थितीत २ षटकांचा पॉवरप्ले ठेवण्यात येत असे. तर ९ षटकांच्या सामन्यात ३ षटकांचा पॉवरप्ले ठेवला जात असे.
आयसीसीने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी हा नवीन नियम बनवण्यात आला आहे आणि तो लागू देखील केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्थानिक टी२० स्पर्धेत टी२० ब्लास्टमध्ये हा नियम वापरला जात आला आहे. हा नियम लक्षात घेऊन आयसीसीने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी हा फॉर्म बनवला असण्याची शक्यता बोलली जात आहे.
आयसीसीच्या या नवीन नियमानुसार, जेव्हा जेव्हा पॉवरप्ले संपतो तेव्हा तेव्हा फील्ड पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सिग्नल देणार. अशा परिस्थितीत, त्या संघाचा कर्णधार समजेल की आता पॉवरप्ले संपलेला आहे.
स्लो ओव्हर रेटच्या समस्येचा सामना करण्यासाठी आयसीसीकडून कसोटी क्रिकेटमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. आता आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम या आता सुरू झालेल्या २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन चक्रापासून लागू केला जाणार आहे. ज्याची सुरुवात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात गॉल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेपासून करण्यात आली आहे. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रत्येक षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढचे षटक सुरू करण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. मैदानावर एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ असेल, जे ० ते ६० सेकंदांपर्यंतचा वेळ दाखवेल. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळेवर षटक टाकणे सुरू केले नाही, तर पहिले दोन इशारेदेण्यात येतील. तिसऱ्या चुकीसाठी, फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड दिला जाणार आहे. तथापि, ८० षटके पूर्ण झाल्यानंतर हे इशारे रद्द मानण्यात येतील.