Amazing Catch VIDEO : अफलातून झेल घेत मॅक्सवेलने केला मोठा चमत्कार; डोळ्याचे पाते लवते न तोपर्यंत घेतला कॅच, पाहा VIDEO
Glenn Maxwell Catch VIDEO : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्याच्या स्फोटक फलंदाजीशिवाय त्याच्या अप्रतिम चपळाईसाठीही ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या मैदानावर आतापर्यंत अनेक अप्रतिम झेल घेतले आहेत. पण यावेळी बिग बॅश लीगमध्ये असा एक झेल घेतला आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने ब्रिस्बेन हीटविरुद्ध हा झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ग्लेन मॅक्सवेलने घेतला अफलातून झेल
GLENN MAXWELL! CATCH OF THE SEASON. #BBL14 pic.twitter.com/3qB9RaxHNb — KFC Big Bash League (@BBL) January 1, 2025
मॅक्सवेलने आश्चर्यकारक झेल घेतला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट संघाला 20 षटकात 5 गडी गमावून केवळ 149 धावा करता आल्या. याचे सर्वात मोठे कारण होते ग्लेन मॅक्सवेलचे क्षेत्ररक्षण. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात एकूण 4 झेल घेतले. या काळात त्याचा शेवटचा झेल सर्वात नेत्रदीपक ठरला. वास्तविक, ब्रिस्बेन हीटच्या डावातील 17 वे षटक स्टार्सचा गोलंदाज डॅनियल लॉरेन्सने टाकले होते. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज विल प्रेस्टीजने समोरून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जो झटपट लाँग-ऑनच्या दिशेने गेला.
सीमेपलीकडचा घेतला झेल
जेव्हा विल प्रेस्टिजने शॉट मारला तेव्हा असे वाटत होते की हा एक मोठा शॉट आहे जो षटकारापर्यंत पोहोचेल, परंतु ग्लेन मॅक्सवेल तिथे उपस्थित होता, त्याने उडी मारली आणि एका हाताने चेंडू पकडला. त्यामुळे त्याने चेंडूला सीमारेषा ओलांडण्यापासून रोखले आणि नंतर त्याच्या अंडरआर्ममधून चेंडू पुन्हा मैदानात आणला. यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात परतला आणि त्याने झेल पूर्ण केला. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या चपळाईने हा अवघड झेल अगदी सोपा केला.
मॅक्सवेलची बीबीएल 2024-25 मधील कामगिरी
बीबीएलचा हा मोसम मॅक्सवेलसाठी आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. या सामन्यापूर्वी झालेल्या 3 सामन्यांमध्ये त्याला केवळ 53 धावा करता आल्या होत्या. त्याचबरोबर गोलंदाजीतही एकच विकेट घेतली आहे. ब्रिस्बेन हीटविरुद्धही त्याने गोलंदाजी केली नाही.






