अमेरिकेचे भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND u19 vs USA U19 LIVE : आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ ची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सलामी सामन्यात बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. टॉस गमावणाऱ्या अमेरिका संघाची भारतीय गोलंदाजीसमोर चांगलीच तारांबळ उडाली. अमेरिचा डाव ३७ षटकातच सर्वबाद १०७ धावांवर संपुष्टात आला आहे. हेनिल पटेलच्या गोलंदाजीने अमेरिकेचे कंबरडे मोडले. त्याने ५ विकेट्स घेतल्या. भारताला विजयासाठी १०८ धावा कराव्या लागणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून अमेरीकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अमेरिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या १ असताना त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर संघातील नितीन सुदिनी सोडता एकाला देखील मैदानावर तग धरता आला नाही. नीतीन सुदिनी ५२ चेंडूत ३६ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार मारले. साहिल गर्ग १६, अमरिंदर गिल १, अर्जुन महेश १६, कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव ०, अदनीत झांब १८, अमोघ अरेपल्ली ३, सबरीश प्रसाद ७, आदित कप्पा ५, ऋषभ शिंपी ० धावा ककरून बाद झाले तर ऋत्विक अप्पीडी ० धावेवर नाबाद राहीला. भारताकडून हेनील पटेलने सारवधिक ५ विकेट्स घेतल्या. आरएस अम्ब्रिस, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारताला विजय मिळवण्यासाठी १०८ धावा कराव्या लागणार आहे.
अमेरिकेसमोर सर्वात मोठे आव्हान १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचे असणार आहे. जो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठ्या जागतिक मंचावर चमकण्याचा प्रयत्न करत आहे. वैभव सूर्यवंशीच्या नावे अनेक मोठे विक्रम जमा आहेत, ज्यात आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ३८ चेंडूत शतक, पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५९ चेंडूत सर्वात जलद १५० धावा आणि युवा एकदिवसीय सामन्यात भारताचा दुसरा सर्वोच्च धावसंख्या, ९५ चेंडूत १७१ धावा यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अमेरिकेसमोर वैभवचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा : ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद
भारत अंडर U19 प्लेइंग 11: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश पनगालिया, आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल
युनायटेड स्टेट्स U19 प्लेइंग 11: साहिल गर्ग, अमरिंदर गिल, अर्जुन महेश (विकेटकीपर), उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), ऋत्विक अप्पीडी, अदनीत झांब, अमोघ अरेपल्ली, नितीश सुदिनी, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, ऋषभ शिंपी






