भारताकडून ऑस्ट्रेलियाकहा ९ विकेट्सने पराभव(फोटो-सोशल मीडिया)
India beat Australia by 9 wickets : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव करून मालिकेचा शेवट गोड केला आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावांवर रोखले तर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २७३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी सुटली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या भरताईय सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाथी ६९ धावांची भागीदारी रचली. शुभमन गिलच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. गिल २४ धावा काढून बाद झाला. त्याला जोश हेडलवुडने माघारी पाठवले. गिल हा एकमेव फलंदाज बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. मागील दोन सामन्यात भोपळा ही न फोडणाऱ्या विराट कोहलीने रोहित शर्मासोबत भारतीय संघाचा डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियन गोलदाजांना एक देखील संधी दिली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने १६८ धावांची अभेद्य भागीदारी रचली. रोहितने कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकवले. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा काढल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर विराट कोहलीने ८१ चेंडूचा सामना करत नाबाद ७४ धावा केल्या. या खेळीत कोहलीने ७ चौकार लागवले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने एकमेव विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मॅथ्यू रेनशॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा उभ्या केल्या. यामध्ये मिशेल मार्श ४१ धावा,मॅथ्यू रेनशॉने ५८ चेंडूत ५६ धावा केल्या, मॅथ्यू शॉर्टने ४१ चेंडूंत दोन चौकारांसह ३० धावा केल्या. अॅलेक्स कॅरी २४ धावा, कूपर कॉनोली २३ धावा, मिच ओवेन १ धाव, मिशेल स्टार्क २ धावा, नॅथन एलिस १६ धावा आणि जोश हेडलवुड ० धावा काढून बाद झाला. भारताकडून हर्षित राणाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक बळी घेतला.
बातमी अपडेट होत आहे..
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग ११ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, मिच ओवेन, नॅथन एलिस, मिशेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेडलवुड
भारताचा प्लेइंग ११ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज






