पोपटाची कमाल; खाल्लेल्या मिठाला जागला, असा ओरडला की उलट्या पायी पळून गेले चोर... Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Funny Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही चोरीच्या घटनांचे देखील अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चोरी कारायला शिरताच चोरासोबत असे काही मजेशीर घडले आहे त्याने धूम ठोकली आहे.
नेमकं काय घडलं?
असे म्हणतात कुत्रा हा सगळ्यात ईमानदार प्राणी असतो. मालकावर कोणतेही संकट आले की तो त्याला वाचवण्यासाठी काहीही करतो. पण इथे काही वेगळे घडले आहे. एका पोपटामुळे चोरी टळली आहे. होय एका पोपटामुळे. आता ती कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर घडलं असे की एक चोर एका अज्ञात घरात खिडकीतून शिरण्याचा प्रयत्न करत होता. तो शिरत असलेल्या रुममध्ये कोणतीही व्यक्ती नव्हती, यामुळे चोर सहज आत आला. पण तिथेच एका कोपऱ्यात एका फांदीवर पोपट बसला होता. कोणला तरी घुसताना पाहताच पोपटाने चोर, चोर म्हणत आरडा-ओरडा सुरु केला. त्याचा आवाज ऐकताच चोराने तिथून धूम ठोकली. याच वेळी एक महिला देखील तिथे आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
चोर के घुसते ही शोर मचा दिया…. ग़ज़ब का सिक्योरिटी गार्ड है।
चोर आ गए चोर……🦜😂 pic.twitter.com/KKpBYdPRTO — Shagufta khan (@Digital_khan01) October 24, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Digital_khan01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देत एकाने, सीसीटीव्ही मस्त आहे असे म्हटले आहे, तर अनेकांना याच्यासारख्या चांगला सिक्युरीटी गार्ड नाही होऊ शकत कोण असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने मी पण आता एक पोपट घेईन म्हणतोय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे याचा माहिती नाही, पण हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






