IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीत बदलणार भारताची सलामी जोडी; केएल राहुल नाही तर रोहित शर्मा करणार डावाची सुरुवात
Boxing Day Test Rohit Sharma : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना खेळला गेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 311 धावा आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या मालिकेत भारतीय सलामीवीराची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत, पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीवीराची भूमिका बजावली होती, परंतु दोन्ही खेळाडू सलामीवीर म्हणून भारतीय संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले.
रोहित शर्मा यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग करणार
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतीय संघाची सलामीची जोडी बदलणार का? केएल राहुल यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग करणार का? मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, कर्णधार रोहित शर्माला मेलबर्न कसोटीत यशस्वी जयस्वालसोबत सलामीवीर म्हणून पाहिले जाऊ शकते. रोहित शर्माने सलामी दिल्यास केएल राहुलला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल. वास्तविक, भारतीय कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत वाईटरित्या फ्लॉप झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. केएल राहुलची कामगिरी संमिश्र झाली असली तरी फलंदाजीचा क्रमांक बदलल्याने रोहित शर्माच्या कामगिरीत बदल होईल का?
भारताकडून केएल राहुलच्या सर्वाधिक धावा
या मालिकेत केएल राहुलने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच, ट्रॅव्हिस हेडनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेडने 4 सामन्यांच्या 6 डावात 68.17 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत. याशिवाय भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यशस्वी जैस्वालने 38.60 च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत. या फलंदाजांनंतर ऑस्ट्रेलियाचा ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ यांचा क्रमांक लागतो. ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अनुक्रमे 193 आणि 192 धावा केल्या आहेत.