फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा कसोटी सामना : टीम इंडिया सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या आताच्या स्थितीवर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत तर एक सामना भारताचा संघाने जिंकला आहे. यामध्ये एक सामना ड्रॉ झाला आहे त्यामुळे भारताचा संघ मालिकेमध्ये १-२ असा पिछाडीवर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या कसोटीमधून बाहेर आहे. त्यामुळे या सामन्याचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आले आहे.
IND vs AUS : रोहितच्या संघाबाहेर होण्यावर गावस्करचं मोठं विधान, म्हणाले – कर्णधार म्हणून हे…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात १८५ धावांवर गडगडला. रोहित शर्माही या सामन्यात खेळत नाही, पण तरीही टीम इंडियाची फलंदाजी कोलमडली. या डावातही धावगती खूपच संथ होती. भारतीय फलंदाजांनी ७२.२ षटके फलंदाजी करत सर्व गडी गमावून १८५ धावा केल्या. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले.
Innings Break!#TeamIndia post 185 in the 1st innings at the Sydney Cricket Ground.
Over to our bowlers.
Live – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/1585njVwsn
— BCCI (@BCCI) January 3, 2025
या सामन्याबद्दल बोलताना रोहित शर्माच्या बाहेर बसण्याच्या निर्णयामुळे जसप्रीत बुमराह टॉससाठी आला. त्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. केएल राहुलनंतर यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाली. यानंतर शुभमन गिलही उपाहारापूर्वी शेवटच्या चेंडूवर पायचीत झाला. चौथा-पाचवा चेंडू खेळून विराट कोहली पुन्हा आऊट झाला तेव्हा भारताने दुसऱ्या सत्रात एक विकेट गमावली. भारताने तिसऱ्या सत्रात आपल्या उर्वरित ६ विकेट गमावल्या.
या डावात ऋषभ पंतने ९८ चेंडूत ४० धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने २६ धावा केल्या. शुभमन गिलने २० धावांची खेळी केली. विराट कोहली १७ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने २२ धावांची खेळी खेळली, जी या मालिकेतील भारतीय कर्णधाराची सर्वात मोठी खेळी होती. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने ४, तर मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. पॅट कमिन्सला २ आणि नॅथन लायनला एक विकेट मिळाली. षटकांचा वेग अतिशय संथ असल्याने पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला यावे लागले. तीन सत्रात केवळ ७२ षटके खेळली गेली.
आता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे. टीम इंडियासाठी या सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. भारताचा संघ कशी गोलंदाजी करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.