फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा क्रिकेट संघ सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाकडे आघाडी आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 150 धावांची आघाडी घेतली आहे. परंतु त्याआधी एक अशी घटना झाली त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तिसरे पंच रिचर्ड केटलब्रो अचानक टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी खलनायक ठरले. रिचर्ड केटलब्रो यांनी असा निर्णय दिल्याने भारतीय संघाच्या शिबिरात निराशेची लाट उसळली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या पिंक बॉल कसोटीदरम्यान, तिसरे पंच रिचर्ड केटलब्रो यांनी सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी त्यांच्या डीआरएस निर्णयामुळे वाद निर्माण केला. या घटनेनंतर थर्ड अंपायर रिचर्ड केटलब्रो यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
3rd umpire says there’s no conclusive evidence to overturn the decision. pic.twitter.com/pY8GjxhthI — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2024
त्याचे असे झाले की ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 58 व्या षटकात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करायला आला. रविचंद्रन अश्विनच्या या षटकातील तिसरा चेंडू ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शच्या पॅडला लागला. त्यानंतर टीम इंडियाने एलबीडब्ल्यूचे अपील केले, जे मैदानावरील पंचांनी नाकारले. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने डीआरएसचा वापर केला. यानंतर रिचर्ड केटलब्रोने मिशेल मार्शच्या बाजूने निकाल दिल्याने वाद सुरू झाला. थर्ड अंपायरने बॉल ट्रॅकिंगकडेही लक्ष दिले नाही आणि स्निकरवरील स्पाइकच्या आधारे मिचेल मार्शला नाबाद दिले. जरी ते पॅड-प्रथम असल्याचे दिसून आले. ऑन-एअर समालोचकांना देखील आश्चर्य वाटले की बॉल ट्रॅकिंग का दाखवले नाही.
Virat Kohli Video : विराट कोहली हटके अंदाजात! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची केली स्लेजिंग
रिचर्ड केटलब्रोच्या या निर्णयामुळे मिशेल मार्श वैयक्तिक शून्य धावांवर बाद होण्यापासून वाचला. थर्ड अंपायर रिचर्ड केटलब्रो हे कव्हरेजवर ऐकले गेले की, ‘फर्स्ट बॅटिंग की पॅड फर्स्ट होती हे सांगण्यासाठी माझ्याकडे कोणताही निर्णायक पुरावा नाही.’ मात्र, रिचर्ड केटलब्रोवर बॉल-ट्रॅकिंग न दिसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. रिचर्ड केटलब्रोच्या या निर्णयामुळे मिचेल मार्शला जीवदान मिळाले.
भारताला 180 धावांवर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 विकेट गमावून 207 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत भारतावर 27 धावांची आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर १-० अशी आघाडी घेतली आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. पहिल्या कसोटीतील विजयानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे. आता टीम इंडियाच्या नजरा ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅच जिंकण्यावर आहेत. भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. भारताने 2018-19 आणि 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. दोन्ही वेळी भारताने कांगारू संघाचा 2-1 असा पराभव केला होता.