फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु आहेत. यामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने २९५ धावानी विजय मिळवला होता. या मालिकेमध्ये टीम इंडियाकडे १-० अशी आघाडीवर आहे. ६ डिसेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. यामध्ये सध्या तरी ऑस्ट्रेलियाचा संघाचे पारडे जड दिसत आहे. परंतु अजूनही दुसरी इनिंग शिल्लक आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये काय होईल हे सांगणे अजूनही कठीण आहे.
गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि स्पर्धाही चुरशीची होत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत 180 धावा केल्या होत्या तर यजमान ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी बाद 86 धावा केल्या होत्या. सध्या कांगारूंचा संघ पहिल्या डावात भारतापेक्षा 94 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात बरेच काही बदलू शकते, पण पहिल्या दिवशी जे घडले त्याने सर्वांनाच हादरवून सोडले. मोहम्मद सिराजचा एक चेंडू 181.6 किमी/ताशी या वेगाने मोजला गेला ज्यावर विश्वास ठेवणे कोणालाही कठीण होते.
ENG vs NZ: इंग्लंडच्या गोलंदाजाने रचला इतिहास! तीन वर्षांत कसोटी क्रिकेटमधील पहिली हॅटट्रिक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पिंक बॉल टेस्टमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजीदरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की मोहम्मद सिराजने 181.6 किमी/तास वेगाने चेंडू टाकला होता. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे हे घडले आणि नंतर सर्व काही स्पष्ट झाले.
After seeing Siraj Bhai’s bowling speed in #AUSvIND
Shoaib Akhtar, Brett Lee, Shaun Tait, and Shane Bond :- pic.twitter.com/ZKv3ner1uR— Shubham kori (@KoriShubh) December 6, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना तांत्रिक बिघाडामुळे गदारोळ झाला होता. या षटकात त्याच्या शेवटच्या चेंडूचा वेग रेकॉर्डब्रेक दाखवण्यात आला, जो पाहून सर्वांचे मन हेलावले. चेंडूचा वेग 181.6 किमी/तास दाखवण्यात आला, जो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूचा वेग आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका यूजरने फोटो शेअर करत या चेंडूच्या वेगाबद्दल लिहिले. मोहम्मद सिराजच्या चेंडूचा वेग पाहिल्यानंतर शोएब अख्तर, ब्रेट ली, शेन बाँड आणि शॉट टेट यांसारखे दिग्गज आश्चर्यचकित झाले.
भारताच्या संघासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने जिंकणे अनिवार्य आहे. कारण जर टीम इंडिया यामध्ये पराभूत झाली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण कठीण होऊ शकते. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर आहे परंतु टीम इंडियाची फायनलमध्ये जागा पक्की झाली नाही त्यामुळे भारताच्या संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने जिंकावे लागणार आहेत.