फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा पुरुष संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कांगारूंच्या संघासोबत खेळत आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेचा दुसरा सामना उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ सुद्धा ऑस्ट्रेलिया महिला संघासोबत मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा मालिकेचा आज शुभारंभ आज होणार आहे. यामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही महिला संघामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. आज या मालिकेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे.
भारताचा महिला संघ ही कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळवली जाणार आहे. या सामन्याचे आयोजन ब्रिस्बेनमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग टेलिव्हिजनवर आणि मोबाईलवर कधी आणि कुठे पाहता येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.
क्रीडा बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आला आहे. तर या मालिकेचा दुसरा सामना रविवारी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्येही होणार आहे. त्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 11 डिसेंबर रोजी पर्थ येथे होणार आहे. या तिन्ही सामन्यांची वेळ वेगळी असणार आहे.
𝗢𝘂𝘁 𝗮𝗻𝗱 𝗔𝗯𝗼𝘂𝘁 𝗶𝗻 𝗕𝗿𝗶𝘀𝗯𝗮𝗻𝗲 𝗳𝘁. 𝗝𝗲𝗺𝗶𝗺𝗮𝗵 & 𝗧𝗶𝘁𝗮𝘀 🛴🌇
When you have conversations over coffee about cricket & beyond 🤗
WATCH the Full Video 🎥🔽 – By @mihirlee_58 #TeamIndia | #AUSvIND | @JemiRodrigues | @titas_sadhu https://t.co/dvdgS4jHwF pic.twitter.com/XwXEJyUv6h
— BCCI Women (@BCCIWomen) December 4, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक असतात. या दोन्ही संघामध्ये पहिला सामन्याचे आयोजन गुरुवारी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50 वाजता सुरू होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सामना चाहत्यांना हा सामना थेट पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स या टीव्ही वाहिनीवर प्रसारण होणार आहे. मोबाईल ॲपवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी Hotstar वर देखील चाहते या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहेत. दुसरा एकदिवसीय सामना रविवारी खेळला खेळवला जाणार आहे, जो भारतीय वेळेनुसार पहाटे 5.15 वाजता सुरू होईल, तर तिसरा सामना सकाळी 9.50 वाजता सुरू होईल.
प्रिया पुनिया, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, राधा यादव, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी, तेजल हसबनीस , उमा छेत्री, हरलीन देओल
बेथ मुनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, ऍशले गार्डनर, ॲनाबेल सदरलँड, अलाना किंग, सोफी मोलिनक्स, मेगन शूट, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वेअरहम, किम गर्थ.