फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामी-श्रेयश अय्यर – भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील मालिकेला १० दिवस शिल्लक राहिले आहेत, यासाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये भारत विरूध्द बांग्लादेश यांच्यामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन T-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टिम इंडियाच्या संघामधून मोहम्मद शामी आणि श्रेयश अय्यर यांना वगळण्यात आले आहे. सध्या दुलिप ट्रोफी 2024 सुरु आहे. यामध्ये श्रेयश अय्यरने दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे जेतेपद जिंकले. तरीही श्रेयश अय्यरला संघामधून वगळण्यात आले आहे.
संघामध्ये सरफराज खान आणि केएल राहुल यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. सरफराज खान आणि केएल राहुल चांगल्या फॅार्ममुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही. त्याचबरोबर मोहम्मद शामीला सुध्दा वगळण्यात आले आहे. भारतीय मधल्या फळीत खूप स्पर्धा आहे यात शंका नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी या मालिकेत सहभागी होणार नाही. पण मोहम्मद शमीला बांग्लादेश मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग का करण्यात आला नाही?
हेदेखील वाचा – गौतम गंभीरने नव्या अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांचा लावला शोध! भारत-बांग्लादेश मालिकेत करणार पदार्पण
भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी संघामधून का वगळण्यात आले आहे या मागचं कारण जाणून घ्या. अलीकडेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संकेत दिले होते की मोहम्मद शमी बांग्लादेश मालिकेतून पुनरागमन करू शकतो, परंतु आता मोठी माहिती समोर येत आहे. मोहम्मद शमी या मालिकेत खेळणार नाही. मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघामध्ये कधी पुनरागमन करेल यावर भारतीय प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.