फोटो सौजन्य - सोशल मीडिया
गौतम गंभीर- युधवीर सिंग : भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरने संघामध्ये सामील होताच अनेक नवे बदल केले आहेत. तीनही फॉरमॅटमधील संघांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक नव्या चेहऱ्याना सुद्धा संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर सध्या भारताच्या क्रिकेट संघामध्ये सध्या भारताच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंटच्या शोधात आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून अनेक अपेक्षा केल्या जात आहेत. गंभीरचा पहिला असाइनमेंट श्रीलंका दौरा होता, जिथे टीम इंडियाने T२० मालिका जिंकली आणि एकदिवसीय मालिका गमावली. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
बांग्लादेशचा संघ २ सामन्यांच्या कसोटी आणि ३ सामन्यांच्या T२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेसाठी गौतम गंभीरने नवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज शोधला आहे, जो भारतासोबत दिसणार आहे. गंभीरचा हा नवीन शोध म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग आहे. KSportsWatch च्या रिपोर्टनुसार, युधवीर बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेट बॉलर म्हणून टीम इंडियामध्ये सामील होईल. १४०-१४५ च्या वेगाने गोलंदाजी करणारा युधवीर सरावात टीम इंडियासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. याशिवाय त्याला स्वत:ला सिद्ध करण्याचीही चांगली संधी मिळणार आहे.
हेदेखील वाचा – बांग्लादेशविरुद्ध भारताचा संघ सज्ज! टीम इंडियाच्या संघामध्ये दिसणार नवे चेहरे
अहवालात एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “काल त्याला कॉल आला आणि त्याला १२ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. ही त्याच्यासाठी खूप चांगली बातमी आहे – भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल.”
युधवीर सिंगने आयपीएलमध्ये आतापर्यत पाच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने आयपीएल २०२३ मध्ये तीन सामने खेळले आहेत आणि आयपीएल २०२४ मध्ये त्याने दोन सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्याने ४ विकेट्स घेतले आहेत.