आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह अधीक्षिका निलंबित(iStock)
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या घटनेची दखल घेत प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका या दोघांनाही तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक चौकशीत शाळेच्या मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच, या प्रकारात महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आरोपीला मदत केल्याचा ठपका अधीक्षिकेवर ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या घटनेनंतर आदिवासी भागातील पालकांत अस्वस्थता पसरली आहे.
हेदेखील वाचा : Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत
आश्रमशाळांमधील देखरेख, नियंत्रण व्यवस्था आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना, नियमित तपासणी आणि कर्मचाऱ्यांची काटेकोर पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
हेदेखील वाचा : एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…
रायगडच्या खोपोलीत काळोखे यांची हत्या
रायगडच्या खोपोलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे हे खोपोलीच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलाच तापलं असून, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
२६ डिसेंबरला मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी ९ आरोपीला अटक केली आहे. आता कर्जत- खालापूर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येचं बीड कनेक्शन असल्याचा थेट आरोप थोरवे यांनी केला आहे.






