मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिकेची सांगता भारताच्या विजयाने झाली. भारतीय संघाने शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला. या विजयाने तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेचा शेवटचा सामना ओव्हल येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने संघर्षपूर्ण विजय मिळवला.या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे मोहम्मद सिराज. त्याने ५ विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. त्याच्या या कामगिरीने एक इतिहास लिहिला गेला आहे.
ओव्हलच्या मैदानावर, इंग्लिश फलंदाज मोहम्मद सिराजविरुद्ध संघर्ष करताना दिसून आले. त्याच वेळी, मोहम्मद सिराज मालिकेत सर्वाधिक चेंडू टाकणारा गोलंदाज देखील ठरला आहे. सिराजच्या या शानदार कामगिरीने आणि त्याच्या मेहनतीने क्रिकेट जगतातील अनेक लोक त्याचे चाहते बनले आहेत.
हेही वाचा : मोहम्मद सिराजच्या कामगिरीवरुन असिम खान आणि तनवीर अहमद भिडले! दोघांनी काढली एकमेकांची लायकी…
ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या सामन्यात मोहम्मद सिराजने ९ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कृत करण्यात आले. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी असे एकूंण संपूर्ण सामन्यात ९ बाली घेतले आणि भारतीय संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. ओव्हल येथे चौथ्या डावात ५ बळी घेणारा सिराज हा पहिला भारतीय आणि एकूण आठवा गोलंदाज ठरला आहे. त्याच वेळी, ४१ वर्षांनंतर, ओव्हल येथे चौथ्या डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम एका गोलंदाजाने आपल्या नावे केला आहे.
वेस्ट इंडिजच्या मायकेल होल्डिंगने शेवटच्या वेळी १९८४ मध्ये पाच बळी घेण्याची किमया साधली होती. होल्डिंगने १९७६ मध्ये देखील हा पराक्रम केला होता. याशिवाय, १९९७ नंतर ओव्हल येथे एका कसोटीत ५ बळी घेणारा सिराज हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचे फ्रेडरिक स्पॉफोर्थ (१८८२), जेजे फेरिस (१८९०), क्लेरी ग्रिमेट (१९३४), पाकिस्तानचे फजल महमूद (१९५४), वेस्ट इंडिजचे कीथ बॉइस (१९७३) यांनी ओव्हल येथे चौथ्या डावात ५ बळी घेण्याची किमया साधली होती.
हेही वाचा : IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..
इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजने आपल्या कामगिरीने आणि त्याच्यातील उर्जेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पाचही सामने खेळणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. त्याने या मालिकेमध्ये २३ बळी घेतले आहेत. २०२० मध्ये पदार्पणापासून सिराज कसोटी स्वरूपात चमकदार कामगिरी करत आला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४१ कसोटी सामन्यांपैकी ७६ डावांमध्ये त्याने १२३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने पाच वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम देखील केला आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ६ बळी ही आहे.