जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स (फोटो-सोशल मिडीया)
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील 3 सामने खेळले गेले असून
यामध्ये इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला 22 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंडमधील बरीच आक्रमकता दिसून आली. आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये उत्साह आहे.
आता लॉर्ड्सवर खेळलेल्या सामन्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. खरंतर, इंग्लंडच्या संघाकडून जसप्रीत बुमराहविरुद्ध एक भयानक योजना आखण्यात आली होती. या योजनेत कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचा माईंड होता. यामध्ये बुमराहला दुखापत करून सामना जिंकण्याची ही योजना आखण्यात आली होती. ही योजना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने उघड केली आहे. लॉर्ड्स कसोटीत फलंदाजी करताना बुमराह रवींद्र जडेजाला चांगली साथ देत होता.
भारताचा माजी फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कैफ म्हणाला की, इंग्लंडचा संघ लॉर्ड्सवर बुमराहला बाद करू शकत नव्हता, अशा वेळी त्यांनी अशी एक योजना आखली की ज्यात ते या सामन्यात बुमराहला बाद करू शकले नाहीत तर ते आगामी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी त्याला जखमी मात्र करू शकतात.
मोहम्मद कैफ म्हणाला की, “स्टोक्स आणि आर्चर बुमराहविरुद्ध बाउन्सर टाकण्याचा विचारात होते. त्यांना बुमराहच्या खांद्याला किंवा बोटाला दुखापत करायची होती.” लॉर्ड्स कसोटीत एका वेळी बुमराहच्या बोटाला दुखापत झाल्याचे दिसले. तथापि, ही दुखापत इतकी गंभीर स्वरूपाची नव्हती. दुसरीकडे, इंग्लंडची ही रणनीती लॉर्ड्स कसोटी सामन्यात मात्र उपयोगात आली नाही.
हेही वाचा : 6,6,6,6,2,6… एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार! ग्लोबल सुपर लीगमध्ये हेटमायरने बॅटने केला कहर, Video Viral
लॉर्ड्स मैदानावरील तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज बुमराहने आपल्या बॅटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात त्याने ५४ चेंडूंचा सामना करून त्याने ५ धावा केल्या होत्या. पण, जवळजवळ एक तास खेळपट्टीवर घालवलेला वेळ खूप महत्त्वाचा ठरला होता. त्याने रवींद्र जडेजासोबत २२ षटके खेळून काढली होती. या काळात दोन्ही खेळाडूंमध्ये ३५ धावांची भारताला जिंकण्यासाठी मदत करणारी भागीदारी झाली होती, परंतु ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाही. परिणामी इंग्लडने भारताचा 22 धावांनी पराभव केला.