रवींद्र जडेजा आणि केएल राहुल (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळववली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसा खेळ संपला असून इंग्लिश संघाने ४ गडी गमावून २५१ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, जो रूट (९९) आणि कर्णधार बेन स्टोक्स (३९) नाबाद आहेत.
हेही वाचा : IND vs ENG Match Preview : 4-1 की 3-2? भारतीय महिला संघ शेवटच्या T20 सामन्यासाठी सज्ज! वाचा मालिकेचा अहवाल
भारताकडून नितीश कुमार रेड्डीने त्यांच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. त्याने जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांना आपली शिकार बनवले. त्याच वेळी, बुमराहने हॅरी ब्रूकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तर रवींद्र जडेजाने ऑली पोपला आपली शिकार बनवले. या सामन्यात एक असा देखील प्रकार बघायला मिळाला जिथे भारतीय संघाचे दोन खेळाडू एकमेकांबद्दल नाराज झाल्याचे दिसून आले. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यात मैदानावर तणाव दिसून आला.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे. पण भारतीय खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाच्याबाबत मात्र ढिसाळ कामगिरी केली. पहिल्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांची खराब क्षेत्ररक्षण राहिले आहे. एजबॅस्टनमध्येही असेच काहीसे दिसून आले होते. जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी येथेही त्यांची कमतरता दिसून आली. या सामन्यात दोन झेल सोडण्यात आले. यातील एक झेल केएल राहुलकडून सोडण्यात आला होता.
त्यावेळी केएल राहुलने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ब्रायडन कार्सचा झेल सोडला होता. रवींद्र जडेजा आतापर्यंत केएल राहुलची ही चूक विसरलेला दिसत नाही. लीड्समध्ये केएल राहुल क्षेत्ररक्षणात हलगर्जीपणा करताच रवींद्र जडेजाकडून त्याला अडवण्यात आले. लॉर्ड्समध्ये, जेव्हा रवींद्र जडेजाला वाटले की राहुल क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे सज्ज नाही, तेव्हा त्याने त्याला म्हटले की केएलने लक्ष ठेवावे, अन्यथा तो म्हणेल की तो लक्ष देत नाही. केएल राहुलसाठीचे जडेजाचे हे विधान स्टंप माइकमध्ये कैद झाले आहे.
हेही वाचा : रोहित शर्माकडून ODI कर्णधारपद देखील हिसकावणार? कोण होणार भारताचा नवा कॅप्टन
लीड्स कसोटीत, केएल राहुलने गिलच्या अनुपस्थितीतही कर्णधारपद भूषवले होते. हे तिसऱ्या सत्रात घडले आहे. यावेळी, उपकर्णधार ऋषभ पंत देखील दुखतापतीमुळे मैदानावर उपस्थित नव्हता. केएल राहुलच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल सांगायचे झाल्यास, तो चांगला खेळत आहे. केएल राहुलने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांमध्ये २३६ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये 1 शतक तर 2 अर्धशतकांचा समावेश आहे.