फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या T20 सामन्याचा अहवाल : एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड पुरुष संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत तर भारतीय महिला संघाची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने काल तिसरा सामना खेळला या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मध्यरात्री सामना पार पडला. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता या मालिकेमध्ये भारताच्या संघाकडे 2–1 अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघाने पहिले गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावामध्ये ९ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. यामध्ये अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. चरणी हिने संघाला २ विकेट्स मिळवून दिले.
IND vs ENG : ‘सिराज- आकाशदीप डूओ’ हिट! 407 धावांवर इंग्लडला गुडाळलं, वाचा सामन्याचा अहवाल
भारताच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, टीम इंडीयासाठी स्मृती मानधना हिने पहिल्या सामन्याच्या शतकानंतर तिने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तिने 49 चेंडुमध्ये 56 धावा केल्या. शेफाली वर्मा ही मागिल दोन सामन्यामध्ये फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. या सामन्यात तिने 47 धावांची खेळी खेळली. जेमिमा रोड्रिक्स या सामन्यात 20 धावाच करु शकली.
The match went down to the wire but it’s England who win the Third T20I by 5 runs#TeamIndia will aim to bounce back in Manchester Scorecard ▶️ https://t.co/lHShFa613K#ENGvIND pic.twitter.com/EArf7TarPY — BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2025