के. एल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी दमदार शतकं ठोकली आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताला ६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यांतर भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आणि तिसऱ्या दिवसाअखेर भारताने २ विकेट गमावून ९० धावा करून ९६ धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुलने दमदार शतक झळकावले आहे. त्याच्या शतकाने भारताला सामन्यात भक्कम आघाडी मिळवून दिली आहे.
चौथ्या दिवशी भारताने ९० धावांवरून पुढे खेळायला सुरवात केली. केएल राहुलने ४७ धावांवरून खेळायला सुरवात केली तेव्हा सावध पवित्रा घेतला होता. त्याच्या सोबत संघाचा कर्णधार शुभमन गिलने ६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली. परंतु त्यामध्ये तो केवळ १० धावांची भर घालु शकला. त्याला ब्रायडन कार्सने १६ धावांवर बाद केले. त्यानंतर संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात फलंदाजील आला. पंत आणि राहुल यांनी अतिशय चतुराईने फलंदाजी करत धावा जमवायला सुरवात केली. या दरम्यान केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले. तो आता १०४ धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत ९५ धावांवर खेळत आहे. भारताला २६० धावांची आघाडी मिळाली आहे.
तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी भारताने ६ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला सुरवात केली. तेव्हा भारताची सुरवात चांगली राहिली नाही. भारताने १६ धावांवर पहिली विकेट गमावली. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला. त्याला ब्रायडन कार्सने बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला पहिल्या डावात शून्यावर बाद होणारा साई सुदर्शन. त्याने केएल राहुलसोबत आश्वासक सुरवात केली. साई सुदर्शन सेट होत असल्याचे दिसत असताना त्याला ३० धावांवर बेन स्टोक्सने आपला शिकार बनवले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाअखेर केएल राहुल(४७) तर गिल ६ धावांवर नाबाद राहुल भारताला ९६ धावांची आघाडी मिळाली होती.
💯 𝙛𝙤𝙧 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡! 👏 👏
His 9⃣th TON in Test cricket 🙌 🙌
What a wonderful knock this has been! 👌 👌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @klrahul pic.twitter.com/XBr9RiheBR
— BCCI (@BCCI) June 23, 2025
हेही वाचा : SL vs BAN : बांगलादेश संघ जाहीर! श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी..
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.