फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्यात पिच रिपोर्ट : भारत विरुद्ध इंग्लंड ५ सामन्यांच्या T२० मालिकेतील दुसरा सामना २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये या सामन्याचे आयोजन चेन्नईच्या एमएस चिदंबरम स्टेडियमवर करण्यात आले आहे. मालिकेतील पहिला सामना ७ गडी राखून जिंकून १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा सामनाही जिंकून आघाडी दुप्पट करण्याकडे लक्ष असणार आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अधिक साथ देते, अशा परिस्थितीत भारत पुन्हा एकदा तीन फिरकी गोलंदाजांच्या रणनीतीने खेळताना दिसतो, अशा परिस्थितीत मोहम्मद शामीच्या खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. अर्शदीप सिंगसह हार्दिक पांड्याच्या रूपाने भारत दुसरा वेगवान गोलंदाज संघाचा भाग असेल असे म्हंटले जात आहे.
चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम फिरकीसाठी अनुकूल मानली जाते, परंतु टी -२० मध्ये, ते कधीकधी फलंदाजांसाठी देखील उपयुक्त ठरते. गेल्या काही वर्षांतील कल पाहता, विकेट सपाट असणे अपेक्षित आहे, तर दव सामन्यात मोठा फरक करू शकते. नाणेफेक जिंकणारे संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतात.
चेन्नईतील या स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताच्या संघाने एक सामना जिंकला आहे तर आणि दुसरा सामना गमावावा लागला होता. २०१२ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारत १ धावाने हरला होता, तर २०१८ मध्ये चेपॉकमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा शेवटचा सामना केला होता, जिथे भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.
या मैदानावर आतापर्यत ८५ सामने झाले आहेत. यामध्ये पहिला फलंदाजी करणारा संघ 49 (57.65%) सामने जिंकला आहे, तर प्रथम गोलंदाजी करून जिंकलेले सामने 36 (42.35%) आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर जिंकलेले सामने हे ४२ (४९.४१%) आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर जिंकलेले सामने हे 43 (50.59%) आहेत. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या २४६ आहे, तर सर्वात कमी धावसंख्या ७० आहे. हाइएस्ट स्कोर इन चेज २०१ आहे. प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 163.89 एवढी आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण २५ T२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने १४ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे, तर इंग्लिश संघाने आतापर्यंत भारताविरुद्ध ११ विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे.