यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात २० पासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. नुकताच इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आहे. आता सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनकडे लागून आहेत. अशातच माजी भारतीय फिरकी गोलंदाज अश्विनने पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. अश्विनने पहिल्या कसोटीत भारतीय इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा ११ खेळाडूंची नावे घोषित केले आहे.
माजी भारतीय ऑफ-स्पिनर आर आश्विनने सलामीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड केली आहे, तर अश्विनने तिसऱ्या जागेवर साई सुदर्शनला स्थान दिले आहे. तसेच, अश्विनने चौथ्या क्रमांकावर गिलची निवड केली आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. आश्विन म्हणाला की, “क्रमांक ६ साठी करुण नायर किंवा ध्रुव जुरेल ही पर्याय असू शकतात. तुम्ही करुणच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करू शकत नाही, परंतु मला वाटते की जुरेल येण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा बुमराहकडून ऑस्ट्रेलियामध्ये खराब कामगिरी झाली तेव्हा आमच्याकडे गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध नव्हते. तर तुम्ही ८ व्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव किंवा इतर कोणत्याही आघाडीच्या वेगवान गोलंदाजाला खेळवता का?” असा प्रश्न देखील विचारला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : लीड्स कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू बसणार बाहेर? नेमकं प्रकरण काय?
आर अश्विनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांना देखील संधी दिली आहे. अश्विनने अष्टपैलू खेळाडूसाठी नितीश कुमार रेड्डी यांच्या नावाकडे दुर्लक्ष केले आहे. तर त्याच्या जागी माजी भारतीय फिरकी गोलंदाजने शार्दुलला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात जागा दिली आहे. अश्विनचा असा विश्वास आहे की शार्दुल इंग्लंडच्या खेळपट्टीवर यशस्वी होऊ शकतो.” याशिवाय, अश्विनने वेगवान गोलंदाजासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना पसंती दिली आहे.
याशिवाय, अश्विनने मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेईल असा गोलंदाजाचे नाव देखील जाही केले आहे. अश्विनने असा विश्वास व्यक्तम केला आहे की, इंग्लंडचा ख्रिस वोक्स या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेऊ शकतो. अश्विन म्हणाला, “जर ख्रिस वोक्स पाचही सामने खेळला तर माझ्या मते तो मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनू शकेल किंवा कदाचित शोएब बशीरही असणारा आहे. भारताकडून, बुमराह सर्व सामने खेळणार नसल्यामुळे, मला वाटते की सिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अशू शकतो.”
हेही वाचा : IND vs ENG : नजर लागली! करुण नायरला सराव करताना दुखापत, लीड्स कसोटीला मुकणार का?
अश्विनने केएल राहुलवर पैज लावली असून विश्वास व्यक्त केला आहे की राहुल या मालिकेत सर्वाधिक धावा करू शकतो. अश्विनने भाकीत केले आहे की, “केएल राहुलला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवडू, परंतु तो फलंदाजीची सुरुवात करत असल्याने, पहिल्या डावात त्याला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणून, मी ऋषभ पंतची निवड करणार आहे. इंग्लंडसाठी जो रूटला दुर्लक्षित करता येणार नाही, तर बेन डकेट देखील एक उत्तम पर्याय आहे.’ असे अस्वहिण म्हणाला.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा