यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : हेडिंग्ले येथे 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वी इंग्लंडने त्यांचा प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा टीम इंडियावर खिळल्या आहेत. असे बोलेल जाता आहे की, रवींद्र जडेजा हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे सराव सत्र पाहून हे म्हटले जात आहे. ज्यामुळे असे दिसून येत आहे की, कुलदीपला त्याच्या खेळण्यासाठी वात बघावी लागण्याची शक्यता आहे. लीड्स कसोटी सुरू होण्यापूर्वीच कुलदीप यादवचे नाव प्लेइंग इलेव्हनमधून वागळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधील दोन मुद्द्यावर जास्त चर्चा होताना दिसून येत आहे. उपकर्णधार ऋषभ पंतने देखील त्याबाबत त्यांच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. नंबर ३ आणि दुसरा मुद्दा भारताने कुलदीप यादवला पहिल्या कसोटीत खेळवावे का? सराव सत्रातून आलेल्या अंदाजावरून, रेव्हस्पोर्ट्झने म्हटले आहे की रवींद्र जडेजा हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, एजबॅस्टन किंवा ओव्हलच्या कसोटी सामन्यात कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेडिंग्ले येथील पहिल्या सराव सत्रात, टीम इंडियाचा सर्व जोर हा वेगवान गोलंदाजांवर दिसून आला आहे. बुमराह, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा नेटवर सतत गोलंदाजी करताना दिसले. या सर्वांनी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या देखरेखीखाली हा सराव पार पडला. अहवालात असे देखील सांगण्यात आले, भारतीय संघ व्यवस्थापन शार्दुल आणि नितीश दोघांचीही निवड करण्याचा विचार करत आहे.
हेही वाचा : IND vs ENG : नजर लागली! करुण नायरला सराव करताना दुखापत, लीड्स कसोटीला मुकणार का?
लीड्समध्ये कसोटी फिरकीने जिंकली..
यापूर्वी म्हणजेच २००२ मध्ये येथे विजय मिळवला तेव्हा तत्कालीन कर्णधार गांगुलीने त्या सामन्यात कुंबळे आणि हरभजन दोघांन देखील खेळवले होते. त्या सामन्यात दोन्ही फिरकी गोलंदाजांनी मिळून ११ विकेट्स मिळवल्या होत्या. अशा परिस्थितीत, आता नवीन कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर. पहिल्या कसोटीत इंग्लंडचे हे प्लेइंग इलेव्हन, दोन मजबूत खेळाडूंनी संघात पुनरागमन केले.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कृष्णा सिंह, अर्शदीप सिंह, अर्शदीप सिंह, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, सी. कुलदीप यादव आणि हर्षित राणा.