भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी अडखळली; 132 धावांवर ऑलआऊट
IND vs ENG T-20 Match : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात आहे. यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्याने घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लडला अवघ्या 132 धावांवर रोखण्यात यश आले. सुरुवातीपासूनच फलंदाजी घसरल्याचे पाहायला मिळाले.
भारताची भेदक गोलंदाजी
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच इंग्लडची फलंदाजी ढासळलेली पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लडची फलंदाज गडगडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लडची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली, अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये फिल्प सॉल्टला झेलबाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर लगेचच बेन डकेटला रिंकू सिंगद्वारे झेलबाद करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले.
वरुण चक्रवर्तीची कमाल
अर्शदीपच्या जोरदार माऱ्याने इंग्लड चांगलीच जेरीस आली त्यानंतर वरुण चक्रवर्तीने एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ दोन विकेट घेत इंग्लडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रूकला त्रिफळाचित करीत इंग्लडला मोठा धक्का दिला. त्यानंतर लगेच लियम लिव्हिंगस्टोनला क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर हार्दिकची जादू पाहायला मिळाली.
हार्दिक पांड्याने जेकब बेथल आणि जोफ्रा आर्चरला बाद केले. उपकर्णधार अक्षर पटेलने गस अॅटकीन्सन आणि जेमी ओव्हरटनला तंबूचा रस्ता दाखवला. वरुण चक्रवर्तीने इंग्लडचा कर्णधार जोस बटलरला नितीश रेड्डीद्वारे झेलबाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. आज नितीश रेड्डीने अफलातून झेल घेत इंग्लडच्या कर्णधाराला तंबूत पाठवले.
भारताने अवघ्या 132 धावांवर रोखले
The SKYBALL 🆚 BAZBALL kicked off with a 🔝 performance by the Indian bowlers! 💪
📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/LnLD5sZlG8
— Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लडने गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. मार्क वूडला रनआऊट करीत इंग्लडला 132 धावांवर रोखले. टीम इंडियासमोर अवघ्या 133 धावांचे लक्ष आहे. टीम इंडियाची फलंदाजी पाहता हा स्कोअर अगदी नगण्य आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने पुढे असणार यात शंका नाही.