फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिकेचा आज पहिल्या सामन्याचा चौथा दिवस सुरु झाला आहे. भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये स्वतःला सावरत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने सलामी देत अर्धशतकी खेळी खेळली आणि भारताच्या संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताचा अनुभवी फलंदाजी विराट कोहलीने संघासाठी १०२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या आणि विकेट गमावली आहे. त्यानंतर आता मैदानावर भारताचा अष्टपैलू रिषभ पंत दुखापत असूनही तो मैदानावर फलंदाजीसाठी आला आहे. तर भारताचा कमालीचा फलंदाज सरफराज खानने संघासाठी शतक झळकावले आहे. सरफराज खानने ११० चेंडूंमध्ये १०० धावा करत त्याच्या करियरचे महत्वाचे शतक नावावर केले आणि भारतीय संघाला संकटातुन बाहेर काढत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिनी मुसळधार पावसामुळे पहिल्या दिनाचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिनापासून खेळ सुरु करण्यात आला. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. भारताचा संघ पहिल्या इनिंगमध्ये ४६ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४०२ धावांचा डोंगर उभा केला होता. त्या डोंगराला पार करत भारताच्या संघ आता फक्त ८० धावा मागे आहे.
Maiden Test 💯! 👏 👏 What a cracker of a knock this is from Sarfaraz Khan! ⚡️⚡️ Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UTFlUCJOuZ — BCCI (@BCCI) October 19, 2024
सरफराज खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक न्यूझीलंडविरुद्ध झळकावले. या शतकाच्या माध्यमातून त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. सर्फराजने ११० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. टीम इंडियाने ५७ षटकात २७५/३ धावा केल्या आहेत. सर्फराजसोबत क्रीझवर असलेल्या पंतने २ चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. बंगळुरू होणाऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. सरफराज खानने सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर दबाव आणला. पंत आणि सरफराजची जोडी हळूहळू टीम इंडियाला सामन्यात परत आणत आहे.