फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना 235 धावांवर सर्व बाद करून कालपासूनच भारताचा संघ पहिल्या इनिंगची फलंदाजी करत आहे. आत्तापर्यंत भारताचे संघाने 43 ओवर खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 195 धावा केल्या आहेत त्याचबरोबर पाच विकेट देखील गमावले आहेत. यामध्ये भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि शुभमन गिल या दोघांनी महत्वाची खेळी खेळल्या आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे संघाने सुरुवात खराब केली असली तरी सध्या मैदानावर शुभमन आणि रवींद्र जडेजा हे टिकून आहेत.
हेदेखील वाचा – CSK मध्ये हा दिग्गज 10 वर्षांनंतर संघात परतणार! IPL 2025 मध्ये कहर करणार
भारताचा अनुभवी फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतकीय खेळी खेळल्याने त्यानंतर त्याने त्याचा विकेट गमावला. ऋषभ पंतने 59 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या तर शुभमन अजूनही मैदानावर टिकून आहे त्याने सध्या 70 धावा केल्या आहेत. सध्या शुभमनची साथ रवींद्र जडेजा देत आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर 52 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माचा सर्वात आधी विकेट गेला त्याने 18 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या. काल शेवटच्या सेशनमध्ये काही वेळासाठी आलेला मोहम्मद सिराज पहिल्या चेंडूत बाद झाला. त्यानंतर मैदानावर विराट कोहली आला होता त्याने सहा चेंडूंमध्ये फक्त चार धावा करून विकेट गमावली. त्यानंतर रिषभ पंत आणि शुभमन गिल यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. आता रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल मैदानावर टिकून आहेत. रवींद्र जडेजाने 18 चेंडूंमध्ये दहा धावा केल्या आहेत. आज भारताचा संघ किती वेळ मैदानावर टिकून राहील आणि किती धावा करेल याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असेल.
हेदेखील वाचा – IND vs NZ 3rd Test Live : रिषभ-शुभमनच्या जोडीने केली कमाल, खेळली अर्धशतकीय खेळी
मागील दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर भारताच्या संघामध्ये दोन मोठे बदल तिसऱ्या सामन्यात करण्यात आले यामध्ये भारताचा महत्त्वाचा आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर केएल राहुलला सुद्धा संघामध्ये जागा मिळाली नाही. त्यांच्या जागेवर मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांना संघामध्ये स्थान देण्यात आले. कालच्या भारतीय गोलंदाजांच्या बद्दल बोलायचं झालं तर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने पाच विकेट्स नावावर केले तर वॉशिंग्टन सुंदरने चार विकेश नावावर केले आणि एक विकेट आकाशदीप च्या नावावर होता.
भारतीय संघाची प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप