फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये आधीच पहिले दोन सामने न्यूझीलंडच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे आता ही मालिका न्यूझीलंडच्या संघाने २-० अशी आघाडी आहे. कालपासून शेवटचा तिसरा सामना सुरु झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने न्यूझीलंडला २३५ धावांवर पहिल्या इनिंगमध्ये बाद केले आहे. भारताचा संघ सध्या पहिल्या इनिंग फलंदाजी करत आहे. टीम इंडियाने पहिला सामन्यात ८४ धावा करत ४ विकेट्स गमावले आहेत.
02 Nov 2024 05:01 PM (IST)
मॅट हेन्री क्लिन बोल्ड, दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्री क्लिन बोल्ड, रविंद्र जडेजाची मोठी सफलता
3RD Test. WICKET! 43.3: Matt Henry 10(16) b Ravindra Jadeja, New Zealand 171/9 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 04:39 PM (IST)
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज विल यंग आऊट, रविचंद्रन अश्विनला आणखी एक मोठी सफलता मिळाली आहे.
3RD Test. WICKET! 32.5: Glenn Phillips 26(14) b Ravichandran Ashwin, New Zealand 131/6 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 04:32 PM (IST)
पुन्हा एकदा रविंद्र जडेजाने विकेट घेत सोढीला पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला आहे.
3RD Test. WICKET! 37.5: Ish Sodhi 8(14) ct Virat Kohli b Ravindra Jadeja, New Zealand 148/7 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 04:14 PM (IST)
जोरदार फटकेबाजी करीत असलेल्या ग्लेन फिलिप्सला अश्विनने क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला.
𝗧𝗜𝗠𝗕𝗘𝗥! 🎯
R Ashwin strikes to dismiss Glenn Phillips 👌 👌
New Zealand 6 down!
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mfSCUEc9iu
— BCCI (@BCCI) November 2, 2024
3RD Test. WICKET! 32.5: Glenn Phillips 26(14) b Ravichandran Ashwin, New Zealand 131/6 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 03:56 PM (IST)
डॅरिल मिशेलला बाद केल्यानंतर आता रवींद्र जडेजाने टॉम ब्लंडेल बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टॉम ब्लंडेल फक्त चार धावा करून विकेट गमावली. आता न्यूझीलंडच्या संघ भारतापेक्षा ७३ धावा पुढे आहे.
02 Nov 2024 03:52 PM (IST)
भारताचा अनुभवी फलंदाज आणि पहिल्या इनिंगमध्ये कमाल करणारा रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी चौथा विकेट घेतला आहे. त्याने डॅरिल मिशेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. डॅरिल मिशेलने संघासाठी ४४ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या आहेत.
Runs backwards
Keeps his eyes 👀 on the ball
Completes an outstanding catch 👍Sensational stuff from R Ashwin! 👏 👏
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ONmRJWPk8t
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 03:50 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता न्यूझीलंडच्या संघाचे २७ ओव्हरचा खेळ संपला आहे. यामध्ये त्याने ३ विकेट्स गमावले आहेत आणि ९३ धावा केल्या आहेत.
02 Nov 2024 02:52 PM (IST)
भारताच्या संघाला दुसऱ्या इनिंगचा तिसरा विकेट मिळाला आहे. अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने संघासाठी तिसरा विकेट घेतला आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला अश्विनने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
02 Nov 2024 02:46 PM (IST)
दुसऱ्या इनींगची सुरुवात झाली आहे, यामध्ये भारताला दुसरा विकेट मिळाला आहे. भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने डेव्हिड कॉन्व्हेने क्रिकेट घेतला आहे. सध्या न्यूझीलंडच्या संघ 11 धावांच्या आघाडीवर आहे. डेबिट कॉन्व्हेने 47 मध्ये 22 धावा केल्या.
02 Nov 2024 02:29 PM (IST)
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाने आज २६२ धावांची खेळी खेळली आहे. आज या सामान्यांच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात झली आहे यामध्ये टी ब्रेकच्या आधी न्यूझीलंडच्या संघाने १ विकेट गमावत २ धावांची आघाडी घेतली आहे.
That's Tea on Day 2 of the Mumbai Test!
Stay Tuned for the Third & Final Session of the Day!
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hqkh7rJOdP
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 01:39 PM (IST)
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आकाशदीपने न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. आकाशदिप दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूमध्ये स्टॅम्प आऊट केले आहे.
3RD Test. WICKET! 0.5: Tom Latham 1(4) b Akash Deep, New Zealand 2/1 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 01:34 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये न्यूझीलंड संघासाठी सलामीवीर फलंदाज डेव्हिड कॉनव्हे आणि कॅप्टन टॉम लॅथम फलंदाजीसाठी आले आहेत.
02 Nov 2024 01:24 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये भारताचा पहिला डाव २६२ धावांवर संपला आहे. सध्या भारताच्या संघाकडे २७ धावांची आघाडी आहे. यामध्ये न्यूझीलंड संघासाठी एजाज पटेल कमालीची कामगिरी करत ५ विकेट्स घेतले आहेत.
3RD Test. WICKET! 59.4: Akash Deep 0(0) Run Out Rachin Ravindra, India 263 all out https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 01:11 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये नववा विकेट गमावला आहे. न्यूझीलंडने नववा विकेट्स रविचंद्रन अश्विनचा गेला आहे. अश्विनने संघासाठी फक्त ३ धावा केल्या. आता फलंदाजीसाठी आकाशदीप येईल.
02 Nov 2024 12:59 PM (IST)
न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने २३५ धावांवर न्यूझीलंडला रोखले. त्यानंतर भारताचा संघाने ५६ ओव्हरमध्ये धावांची बरोबरी केली आहे आणि शेवटच्या चेंडूंमध्ये रविचंद्रन अश्विनने षटकार ठोकून टीम इंडियाने सामन्यात आघाडी घेतली आहे.
02 Nov 2024 12:50 PM (IST)
भारताचा फलंदाज शुभमन गिलने संघासाठी महत्वाची खेळी खेळली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये १४६ चेंडूंमध्ये ९० धावांची कमालीची खेळी खेळली. आता फलंदाजीसाठी रविचंद्रन अश्विन आला आहे. अजुनपर्यत टीम इंडिया न्यूझीलंडची बरोबरी करण्यासाठी ८ धावा मागे आहे.
02 Nov 2024 12:27 PM (IST)
रवींद्र जडेजाचा विकेट गेल्यानंतर भारताचा फलंदाज सरफराज खान फलंदाजीसाठी आला होता परंतु तो चार चेंडू खेळून त्याने स्वतःची विकेट गमावली आहे. आता मैदानामध्ये वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला आहे.
02 Nov 2024 12:25 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड भारताच्या संघाने वानखेडे मैदानावर सहावा विकेट गमावला आहे. भाताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने स्वतःचा विकेट गमावला आहे. त्याने 25 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या. आता टीम इंडियासाठी सरफराज खान फलंदाजीसाठी आला आहे.
02 Nov 2024 12:17 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरु असलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या २०० धावा ४६ ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या आहेत. सध्या मैदानावर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा टिकून आहेत.
02 Nov 2024 11:44 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिनाचा पहिला सेशन झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने १९५ धावा केल्या आहेत आणि ५ विकेट्स गमावले आहेत. सध्या मैदानावर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा मैदानावर टिकून आहे. पहिल्या सेशननंतर भारताचा संघ न्यूझीलंडपेक्षा ४० धावा पिछाडीवर आहे.
It's Lunch on Day 2 of the Mumbai Test! #TeamIndia added 1⃣0⃣9⃣ runs to their overnight score to move to 195/5.
7⃣0⃣* for Shubman Gill
6⃣0⃣ for Rishabh PantWe shall be back for the Second Session shortly! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uyJeIkxsAr
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 11:00 AM (IST)
भारताचा अनुभवी फलंदाज रिषभ पंतचा ईश सोधीने विकेट घेतला आहे. रिषभ पंत संघासाठी ५९ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. आता फलदांजीसाठी रवींद्र जडेजा मैदानात आला आहे.
3RD Test. WICKET! 37.3: Rishabh Pant 60(59) lbw Ish Sodhi, India 180/5 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 10:49 AM (IST)
भारताच्या संघाचा तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाने ३५ ओव्हरचा खेळ संपला आहे. सध्या टीम इंडियासाठी रिषभ पंत आणि शुभमन गिल मैदानामध्ये टिकून आहेत. दोघांनी अर्धशतकी खेळी खेळली आहे. ३५ ओव्हरमध्ये भारताच्या संघाने १६९ धावा केल्या आहेत. यामध्ये ४विकेट्स गमावले आहेत आणि संघाला अजून ६६ धावांचा पाठलाग करायचा आहे.
02 Nov 2024 10:20 AM (IST)
भारताचा अनुभवी फलंदाज रिषभ पंतने कमालीची कामगिरी केली आहे. त्याने काल फक्त एक चेंडू खेळला होता. आज या सामान्यांच्या दुसऱ्या दिनी पहिल्याच सेशनमध्ये कमालीची कामगिरी करत ५० धावांची खेळी खेळली. रिषभ पंतने संघासाठी फक्त ३६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आहेत.
02 Nov 2024 10:17 AM (IST)
कालपासून भारताचा फलंदाज शुभमन गिल मैदानामध्ये टिकून आहे. त्याने आज दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनमध्ये अर्धशतक ठोकल आहे. शुभमन गिलने ६६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आहेत.
02 Nov 2024 10:10 AM (IST)
रिषभ पंत आणि शुभमन गिल हे सध्या मैदानावर टिकून आहेत. टीम इंडियाचे दोन्ही फलंदाज मैदानावर मजबूत पकड तयार केली आहे. रिषभ पंत आणि शुभमन गिल यांनी ५७ चेंडूंमध्ये ५८ धावांची भागीदारी केली आहे.
Shubman Gill gets to his 7th Test half-century!
An entertaining FIFTY partnership comes 🆙 between him and Rishabh Pant 🤜🤛#TeamIndia trail by 83 runs
Live - https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/in6ILLdrzG
— BCCI (@BCCI) November 2, 2024
02 Nov 2024 10:06 AM (IST)
२७ व्या ओव्हरमध्ये भारताचा फलंदाज शुभमन गिलने चौकारासाठी चेंडूं उडवला पण केन विलियमसॅनच्या जागेवर आलेला चॅम्पन च्या हातामध्ये चेंडू आला होता. परंतु त्याला तो झेल घेता आला नाही आणि शुभमन गिलला जीवनदान मिळाले.
02 Nov 2024 10:04 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे, आज या सामन्याचा दुसऱ्या दिनाची सुरुवात झाली आहे. भारताच्या संघाचे पहिल्या इनिंगचे २६ ओव्हर झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने -४ विकेट्स गमावून १२६ धावा केल्या आहेत आणि १०९ धावा मागे आहेत.
02 Nov 2024 08:51 AM (IST)
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप