तरुण वयात केस पांढरे झाले असतील तर आवळ्याचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर डाय
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्यासोबतच केसांची योग्य काळजी घेतली जात नाही. केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस पांढरे होणे इत्यादी केसांच्या वाढू लागतात. केसांच्या समस्या वाढल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता केसांची योग्य काळजी घ्यावी. कारण केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हल्ली तरुण वयातील मुलामुलींचे मोठ्या प्रमाणावर केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर केसांमध्ये खूप जास्त खाज येते. ल्पमध्ये वेदना, जळजळ, कोरडेपणा, हेअर फॉल इत्यादी बऱ्याच समस्या वाढू लागतात. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी हेअर डाय, हेअर कलर लावला जातो.(फोटो सौजन्य – istock)
हेअर डाय लावल्यानंतर केसांमध्ये कोरडेपणा, स्काल्पमध्ये जळजळ, केसांचा कोरडेपणा आणि दीर्घकाळ हेअर फॉल इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय हेअर डायमध्ये असलेले केमिकलयुक्त हानिकारक घटक केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आवळ्याचा वापर करून हेअर डाय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला नॅचरल हेअर डाय केसांच्या वाढीसाठी आणि केस नव्याने काळे करण्यासाठी मदत करतो. केस पांढरे झाल्यानंतर कोणतीही मेहंदी किंवा हेअर डाय लावण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून बनवलेला हेअर डाय लावावा.
भारतीय स्वयंपाक घरात आवळ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आवळ्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासोबतच त्वचा आणि केस चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. आवळ्यामध्ये विटामिन सी, ए, अँटीऑक्सिडेंट्स आणि टॅनिन्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. विटामिन युक्त आवळ्याच्या वापरामुळे केस मजबूत आणि हेल्दी होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित एक आवळा खावा. यामुळे तुमचे केस अतिशय मजबूत आणि घनदाट होतील. आवळा केसांसाठी मेलानिन तयार करतो, ज्यामुळे उतार वयात सुद्धा केस काळेभोर राहतात.
मोठ्या वाटीमध्ये आवळ्याची पावडर घेऊन त्यात कोमट पाणी मिक्स करा. तयार केलेली जाडसर पेस्ट काहीवेळ बाजूला ठेवा. त्यानंतर आवळ्याची पेस्ट केसांवर लावून ३० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे आवळ्यातील घटक केसांच्या मुळांना पोषण देतील. काहीवेळ ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हे सर्व पदार्थ केसांच्या मुळांना भरपूर पोषण देतात. नियमित एक आवळा खाल्ल्यास केसांच्या बऱ्याच समस्या कायमच्या नष्ट होतील. हेअर डाय बनवताना तुम्ही त्यात कॉफी, काळा चहा सुद्धा मिक्स करून लावू शकता. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.






