सूर्यकुमार यादव आणि चरिथ असलंका(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आज २६ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. आशिया कप स्पर्धेतील हा शेवटचा सुपर ४ सामना आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी केवळ औपचारिकता असणार आहे. भारतीय संघ बांगलादेशल पराभूत करत आधीच अंतिम फेरीत पोहचला आहे. तर श्रीलंकेचा संघ सुरुवातीचे दोन्ही सामने गमावून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तथापि, श्रीलंकेचा संघ हा शेवटचा सुपर ४ सामना जिंकून स्पर्धेतून सन्मानजनक निरोप घेण्याचा प्रयत्न करेल. तर भारतीय संघ हा सामना जिंकून आनंदी भावनेने अंतिम फेरीत प्रवेश करण्यास उत्सुक असणार आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजचा सुपर ४ सामना ८ वाजता सुरू होणार आहे तर दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी ७:३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानावर एकत्र येतील. हा सामना क्रिकेट चाहते त्यांच्या टीव्हीवर विविध सोनी स्पोर्ट्स चॅनेल आणि डीडी स्पोर्ट्सवर बघू शकतात. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर उपलब्ध असणार आहे. जिथे तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता पडणार आहे.
दुबई येथे खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर ४ सामन्यादरम्यान आर्द्रता ५०% च्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. खेळपट्टीबद्दल सांगायचे झाले तर भारतीय संघाने या मैदानावर त्यांचे दोन्ही सुपर फोर सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या १७० धावा इतकी असून दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या १५० धावा इतकी आहे.
आजच्या सुपर ४ सामन्यात अभिषेक शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. तो चालू स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीचा सामना आजवर कोणताही संघ करू शकलेला नाही. दरम्यान, श्रीलंकेच्या बाजूने वानिंदू हसरंगा टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो. चालू हंगामात, तो त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीने त्याच्या संघासाठी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ४१ वर्षांत प्रथमच IND VS PAK अंतिम सामन्याचा थरार! जाणून घ्या आशिया कपचा इतिहास
भारतः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू संजू, हरिखेत, रवींद्रन आणि राजकुमार सिंग.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महेश थेक्शाना, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, डुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, ब. आणि मथिशा पाथीराना.






