भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज शेवटचा सुपर ४ सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत पोहचले आहेत. अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जिथे भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा प्रसंग खूप खास असणार आहे. कारण आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात लढत देणार आहेत.
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली आणि सध्याचा आशिया कपचा हा १७ वा हंगाम आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळवली जात आहे. यापूर्वी, २०१६ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा टी २० स्वरूपात खेळवली गेली होती. आता क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
भारत आशिया कप स्पर्धेत अव्वल राहीला आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अनेक वेळा एकमेकांसमोर आले असले तरी, या दोन संघात आजवर आशिया कप इतिहासात कधीच अंतिम सामना खेळला गेला नाही. म्हणूनच २०२५ चा अंतिम सामना ऐतिहासिक सामना असणार आहे कारण भारत आणि पाकिस्तान ४१ वर्षात पहिल्यांदा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत.
हेही वाचा : तस्किन अहमदने रचला इतिहास! बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम