एडन मार्कराम(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मोठी धावसंख्या उभारून देखील भारत पराभवाच्या छायेत दिसत आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामने शानदार शतक झळकवले आहे.
हेही वाचा : भारताचा नवा अवतार पाहिलात का? T20 World Cup 2026 साठी BCCI कडून नव्या जर्सीचे अनावरण
भारताने दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. २६ धावांवर क्विंटन डी कॉक बाद झाला. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा मैदानात आला. त्याने आणि मार्करामने १०१ धावांची भागीदारी रचली. टेम्बा बावुमा ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्करामने आपले शतक पूर्ण केले. सतक पूर्ण केल्यावर तो बाद झाला. त्याने ९८ चेंडूत ११० धावा केल्या. यामध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिकणून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने शानदार फलंदाजी करत ३५८ धावा उभ्या केल्या. भारतीय डावाची सुरुवात चांगली झाली नसली तरी विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी झळवेळलेल्या शतकांच्या जोरावर भारताने मोठी मजल मारली. भारताला ४० धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला नांद्रे बर्गरने १४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली मैदानावर आला.
रोहितनंतर यशस्वी जैस्वालही झटपट बाद झाला. त्याला २२ धावांवर मार्को जॅनसेनने बाद केले. चौथ्या नंबरवर आलेला ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांनी डाव सावरला आणि या दोघांनी १९५ धावांची मोठी भागीदारी रचली. या दोघांनी शनादार शतके लगावली. ऋतुराजने ८३ चेंडूत १०५ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार ठोकले. ऋतुराजनंतर विराट कोहलीने देखील शतक झळकवले. विराट आपले शतक पूर्ण करून बाद झाला. त्याने ९३ चेंडूत १०२ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच केएल राहुलने देखील ६६ धावांची नाबाद खेळी केली. तर जाडेजा देखील २४ धावांवर नाबड राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि एनगिडीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .






