T20 World Cup 2026 साठी BCCI कडून नव्या जर्सीचे अनावरण(फोटो -सोशल मीडिया)
Indian cricket team’s new jersey launched : भारत आणि श्रीलंका हे देश संयुक्तपणे पुढील वर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ चे आयोजन करणार आहे. अलिकडेच आयसीसीकडून टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या नवीन टी२० विश्वचषक २०२६ जर्सीचे अनावरण केले आहे.
बीसीसीआयकडून लाँच करण्यात आलेल्या नवीन जर्सीमध्ये यावेळी मोठा बदल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग कॉलरवर स्पष्टपणे दिसत असून ज्यामुळे ते अधिक आकर्षक वाटत आहे. जर्सीच्या पुढील बाजूस हलके आणि गडद निळे पट्टे दिसून येत आहेत. या लिकमुळे हरतीय संघाची नवीन जर्सी अधिकच आकर्षक दिसत आहे. जर्सीच्या सीमा या नारंगी असून त्यामुळे पारंपारिक भारतीय संघाचा लूक कायम राहतो.
नवीन जर्सीमध्ये दोन चमकणारे तारे दाखवण्यात येत आहेत. हे दोन तारे खेळाडू भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या दोन टी-२० विश्वचषक विजयांचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये पहिले विजेतेपद २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.त दुसरे विजेतेपद २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकले होते. जर्सी लाँचच्या करण्यात आली तेव्हा युवा फलंदाज तिलक वर्मासह टी-२० विश्वचषकाचा राजदूत रोहित शर्मा देखील उपस्थित होता. या दोघां खेळाडूंकडून नवीन जर्सी चाहत्यांना सादर करण्यात आली.
Rohit Sharma unveils the jersey for T20 World Cup 2026 🙌🏼 📸\ BCCI#indvssa #viratkohli #rohitsharma #shubmangill #bharatarmy #COTI 🇮🇳 #rishabhpant #jaspritbumrah #dhoni pic.twitter.com/4ysKSf0iDF — The Bharat Army (@thebharatarmy) December 3, 2025
भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ त्यांचा दूसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाचा हाय प्रोफाईल सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताचा ग्रुप अ मधील शेवटचा सामना १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्स संघाविरुद्ध अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.






