सौजन्य - BCCI भारतीय संघाने रचला इतिहास, संजू सॅमसन आणि तिलक वर्माची वादळी खेळी, विदेशात रचल्या सर्वाधिक 283 धावा
IND vs SA 4th T20I Match : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत विरुद्ध द. अफ्रिका शेवटच्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाकेदार खेळी करीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आज संजू सॅमसन आणि तिलक वर्माने अफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अवघ्या 15 ओव्हरमध्ये 200 धावा ठोकण्याचा विक्रम संजूने केला आहे.
संजू सॅमसन आणि तिलक वर्माची शानदार विक्रमी खेळी
9⃣ 🤝 7⃣2⃣
Sanju Samson 🤝 Tilak Varma
𝗜𝗻 𝗙𝗿𝗮𝗺𝗲: The ONLY two Indians to score 2⃣ successive T20I 💯s 👏 👏
Live ▶️ https://t.co/b22K7t8KwL#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/lvm31r6s5c
— BCCI (@BCCI) November 15, 2024
भारतीय खेळाडूंच्या नावावर विदेशातील मोठा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी अद्भूत विक्रम आपल्या नावावर केला आहे. द. अफ्रिकेविरुद्ध दोन फलंदाजांनी शतकी खेळी करीत इतिहास रचला आहे. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजूने डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्मा जोरदार फटकेबाजी करीत असताना एक मोठा फटका मारण्याच्या नादात 36 धावांवर सिमपालाच्या चेंडूवर क्लासेनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने दुसऱ्या विकेट साठी सर्वात मोठी भागीदारी रचत नवीन विक्रम केला.
सर्वात मोठी भागीदारी
दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी केली. तसेच, टीम इंडियाच्या विदेशातील 283 धावांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. या दोघांनी सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रमदेखील आपल्या नावावर केला. याच सामन्यात सर्वाधिक छक्के या सामन्यात मारले.
टीम इंडियासाठी दोघांची शतके
भारतीय संघाच्या या जोडीने आपले वैयक्तिक शतकदेखील साजरे केले. या दोघांनी शतकी खेळी करीत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. संजू सॅमसनने 56 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने 47 चेंडूत 120 धावांची मोठी खेळी केली. दोघांनी मिळून 210 धावंची मोठी भागीदारी रचली
वैयक्तिक विक्रम
भारत विरुद्ध द. अफ्रिका सामन्यात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये संजूने मोठी खेळी करीत शानदार शतक ठोकले. तर दुसऱ्या बाजूने तिलक वर्माने धमाकेदार खेळी करीत शतक ठोकले. संजूने या मालिकेत दुसरे शतक ठोकले तर या वर्षात तीन शतके ठोकण्याचा विक्रम. तिलक वर्माने या मालिकेत दुसररे शतक ठोकले.
टीम इंडियाच्या नावावर झालेले नवीन विक्रम
सर्वाधिक सिक्सर -23
विदेशात सर्वात मोठा स्कोअर – 283 धावा
सर्वात मोठी भागीदारी – 210 धावा
संजू सॅमसनच्या 56 चेंडूत, 109 धावा, तिलक वर्माच्या 47 चेंडूत 120 धावा