फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना सुरु आहे, पहिल्या सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे आणि आतापर्यत दक्षिण आफ्रिका संघाच्या दोन्ही इंनिग संपल्या आहेत. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन्ही इंनिगमध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली आहे आता सध्या टीम इंडियासमोर 124 धावांचे लक्ष उभे केले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बवुमा याने अर्धशतक ठोकले पण आता सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सुरू आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला किमान धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आणि त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने फक्त दोन षटके टाकली आणि दोन विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान, डीएसपी सिराजने त्याच्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली, सायमन हार्मरला क्लिन बॉलिंग करून स्टम्पचे दोन तुकडे केले. यामुळे चाहते आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ नक्कीच स्तब्ध झाला असेल. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
You just can’t keep him out of the game! 🔥#MohammedSiraj gets the 9th wicket for #TeamIndia! 🙌👊#INDvSA | 1st Test, Day 3, LIVE NOW 👉 https://t.co/19cUrY4aXc pic.twitter.com/OZeAB4Ac26 — Star Sports (@StarSportsIndia) November 16, 2025
९१ धावांत ७ विकेट गमावल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज हार मानेल असे वाटत होते. तथापि, कॉर्बिन बॉश आणि टेम्बा बावुमा यांच्यात चांगली भागीदारी दिसून आली. जेव्हा आफ्रिकेचा संघ १३५ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा जसप्रीत बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. सामन्यात मोहम्मद सिराजला एकही ओव्हर देण्यात आला नव्हता, जे आश्चर्यकारक होते. अखेर सिराजला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने सायमन हार्मरला क्लीन बोल्ड केले. स्टंपचे दोन तुकडे झाले आणि हा क्षण व्हायरल होत आहे. त्यानंतर त्याने केशव महाराजलाही बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्ण केला.
भारतीय संघाला विजयासाठी १२४ धावांची आवश्यकता आहे. त्यांची सुरुवात खराब झाली, यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच केएल राहुलनेही मार्को जानसेनने बाद होऊन आपली विकेट गमावली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत भारताने १० धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल सध्या क्रीजवर आहेत. कर्णधार शुभमन गिलची तब्येत ठीक नसल्याने लक्ष्याचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजांसाठी कठीण होईल. मानेला दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करू शकणार नाही.






