दुसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर मजबूत पकड (फोटो सौजन्य - Instagram)
IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
STUMPS, DAY 2! Sri Lanka end the day at 8/2 after 3 overs, with Prasidh Krishna and Manav Suthar picking up a wicket each. India lead by a massive 495 runs. #SLvsIND@ICC pic.twitter.com/vrd4C2JtRm — Doordarshan Sports (@ddsportschannel) August 24, 2026
🚨 SUTHAR STRIKES! 🌀🔥 Manav Suthar traps Prabath Jayasuriya LBW for 2, and Sri Lanka lose another wicket! India keep tightening the screws in Colombo. 🇮🇳💪#SLvIND #3rdManView pic.twitter.com/r88qSljJmL — Third Man View (@3rdManView) August 24, 2026
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या दिवसाच्या ३००/५ या धावसंख्येवरून खेळ पुन्हा सुरू केला. धावसंख्या ४७५/८ पर्यंत पोहोचली होती, परंतु मुसळधार पावसामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. या सामन्यात, कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेरीस, भारतीय संघाकडून ध्रुव जुरेल (७) आणि सारांश जैन (४) नाबाद राहिले. भारतीय संघाकडून देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले, तर कर्णधार गिलनेही ५० धावांची खेळी केली.
प्रसिद्ध कृष्णाने श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या षटकातच पहिला बळी घेतला. स्लिपमध्ये सतर्क असलेल्या यशस्वी जैस्वालने झेप घेऊन एक अप्रतिम झेल पकडला आणि लाहिरू उदाराचा डाव संपवला. जेव्हा ही विकेट पडली, तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या केवळ एक होती आणि इतकंच नाही तर मानव सुथारने दुसरी विकेट घेत पकड मजबूत केली. दुसऱ्या कसोटीच्या दोन दिवसांच्या खेळानंतर असे म्हणता येईल की, भारताने श्रीलंकेवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे.
भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये वर्चस्व गाजवले. देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत यांनी दमदार शतके झळकावून भारताला ५०३ धावांपर्यंत पोहोचवले, जिथे डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन श्रीलंकेची सुरुवात खराब केली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या ८ बाद २ आहे आणि सध्या श्रीलंकेचा संघ हा भारतीय संघापेक्षा ४९५ धावांनी मागे आहे.






