भारतीय महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND w VS AUS w : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. राधा यादवला भारत अ महिला संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील आणि वेगवान गोलंदाज तितस साधू या खेळाडू संघात परतले आहेत. ७ ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरवात होणार आहे आणि हा दौरा २४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या दरम्यान, भारत अ संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक चार दिवसांचा सामना खेळणारया आहे. बीसीसीआयकडून तिन्ही मालिकांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे.
ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील आणि वेगवान गोलंदाज तितस साधू दुखापतीतून सावरल्या असून त्या संघात परतल्या आहेत. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषकापासून श्रेयंका दुखापतग्रस्त होती त्यामुळे खेळू शकली नव्हती. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महिला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी गतविजेत्या बार्बाडोस रॉयल्सकडून तिची निवड आधीच करण्यात आली आहे. साधूला श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत खेळता आले नव्हते. तसेच दुखापतीमुळे एप्रिलमध्ये झालेल्या इंग्लंडच्या सध्याच्या व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी देखील ती संघात नव्हती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत श्रयांकाचे खेळणे बीसीसीआय ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ कडून मंजुरी मिळण्यावर अवलंबून असणार आहे. तर साधूला मंजुरी देण्यात आली आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव टी २० आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा आहे. सलामीवीर शेफाली वर्मा हिला देखील सर्व संघात स्थान दिले गेले आहे. या आक्रमक सलामीवीराचा इंग्लंड दौरा खूपच निराशाजनक राहिला आहे कारण तिला आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये फक्त 101 धावाच करता आल्या आहेत आणि तिची सर्वोच्च धावसंख्या 47 धावा राहिल्या आहते.
राधा यादव (कर्णधार), मीनू मणी (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, डी वृंदा, सजना सजीवन, उमा छेत्री (यष्टीरक्षक), राघवी बिश्त, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, नंदिनी कश्यप (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, शशिमा ठक, शशिमा व्ही. साधू.
राधा यादव (कर्णधार), मीनू मणी (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तेजल हसबनीस, राघवी बिश्त, तनुश्री सरकार, उमा छेत्री (यष्टीरक्षक), प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, नंदिनी कश्यप (यष्टीरक्षक), धारा गुज्जर, जोशीता ठसे, शशितामके, जोशीमा, जोशीला साधू.
हेही वाचा : Lord’s Cricket Ground : सचिन तेंडुलकरचा एमसीसीकडून खास सन्मान! Museum मध्ये झळकलं क्रिकेटच्या देवाच चित्र..
टी२० मालिकेचे वेळापत्रक
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक