सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा आजपासून तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी, लॉर्ड्स येथील एमसीसी (मेरीलेबोन क्रिकेट क्लब) संग्रहालयात भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरच्या फोटोचे अनावरण करण्यात आले आहे. हे चित्र प्रसिद्ध कलाकार स्टुअर्ट पिअर्सन राईट यांनी रेखाटले आहे.हे चित्र वर्षाच्या अखेरीपर्यंत संग्रहालयात राहणार असून त्यानंतर, ते लॉर्ड्स येथील पॅव्हेलियनमध्ये लावण्यात येणार आहे.
सचिन तेंडुलकर क्रिकेट जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने १९८९ ते २०१३ पर्यंत एकूण २४ वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळलेले आहे. या दरम्यान त्याने ३४,३५७ धावा केल्याया आहेत, ज्या आतापर्यंतच्या सर्वोच्च धावा आहेत. हे चित्र १८ वर्षे जुन्या छायाचित्राच्या आधारावर बनवण्यात आले आहे. जे कलाकाराने मुंबईतील सचिनच्या घरी काढले होते.
हेही वाचा : Wimbledon 2025 : नोवाक जोकोविचने रचला इतिहास! दिग्गज फेडररचा विक्रम उध्वस्त, सेमीफायनल मारली धडक
एमसीसी संग्रहालयात भारतीय खेळाडूचा हा पाचवा फोटो ठरला आहे. यापैकी चार फोटो पिअर्सन राईट यांनी काढलेले आहेत. यामध्ये कपिल देव, बिशन सिंग बेदी, दिलीप वेंगसरकर आणि आता सचिन तेंडुलकरचा फोटो लावण्यात आला आहे. यावेळी सचिनचा जो फोटो काढला आहे तो थोडा वेगळा असून डोक्यावर आणि खांद्यावर केंद्रित असलेला हा एक मोठा फोटो आहे, ज्यामध्ये त्याचा चेहरा गंभीर आणि शक्तिशाली दिसून येत आहे. कलाकाराने चित्राची पार्श्वभूमी खूप साधी ठेवलेली दिसत आहे. जेणेकरून लक्ष फक्त सचिनवरच केंद्रित होईल.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, “ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. १९८३ मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा मी पहिल्यांदा टीव्हीवर लॉर्ड्स पाहिले होते. आमचे कर्णधार कपिल देव ट्रॉफी उचलताना तेव्हा दिसले होते. तो क्षण माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीचे कारण बनला आहे. आज जेव्हा माझा फोटो लॉर्ड्समध्ये लावण्यात येत आहे, हे पाहून असे वाटते की माझा प्रवास आता पूर्ण झाला आहे. हे खूप खास आहे.”
A legendary frame 🖼️
📸📸 Snapshots from portrait unveiling of the legendary Sachin Tendulkar at the Lord’s Museum 👌👌#TeamIndia | @sachin_rt pic.twitter.com/5KtnfvNEpf
— BCCI (@BCCI) July 10, 2025
हेही वाचा : Ind vs Eng 3rd Test : ‘यॉर्कर किंग’ बूमराह लॉर्ड्सवर रचणार इतिहास! इशांतचा ‘हा’ विक्रम धोक्यात; वाचा सविस्तर
कलाकार स्टुअर्ट पिअर्सन राईट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि,”एमसीसी हा फोटो मागील फोटोंपेक्षा वेगळा बनवू इच्छित होते. म्हणून यावेळी मी सचिनचा चेहरा मध्यभागी ठेवून एक नवीन शैलीला स्वीकारले. एमसीसीच्या कलेक्शन मॅनेजर चार्लोट गुडह्यू यावेळी म्हणाल्या की, “आम्हाला अभिमान आहे की आम्ही सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूचा फोटो आमच्या कलेक्शनमध्ये लावू शकतो. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान याचे अनावरण करणे हेअधिक विशेष आहे, कारण हजारो लोक ते पाहू शकणार आहेत.”