कोलंबो : आशिया कप (Asia Cup) 2023 सुपर 4 मध्ये दोन दिवस चाललेल्या सर्वात हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकवर भारताने काल ऐतिहासिक २२८ धावांनी विजय मिळवला आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात सामना खेळविण्यात आला, पण सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना रिझर्व डेला सोमवारी पुन्हा खेळविण्यात आला. ज्या ठिकाणी सामना थांबला तेथून सामना पुन्हा खेळवला गेला. रविवारी २ बाद १४७ धावा भारताने केला. काल तिथून सुरुवात करताना के एल राहुल व विराट कोहलीने विक्रमी भागिदारी करत वैयक्तिक शतक करत संघाला धावांचा डोंगर उभा करुन दिला. के एल राहुलने १११ धावा तर विराट कोहलीने १२२ धावांची खेळी साकारत ३५६ धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर दिले. मात्र, पाकची सुरुवात निराशाजनकच झाली. आणि फक्त पाकिस्तानला १२८ धावा करता आल्या, त्यामुळं भारताने ऐतिहासिक म्हणजे २२८ धावांनी विजय मिळवला आहे. यानंतर आज सलग दुस-या दिवशी भारत आणि श्रींलका (India Vs Sri Lanka ) यांच्यात सामना होणार आहे. (India’s match today for the second day in a row; T India will clash with Sri Lanka, what change in the team)
भारताला आज सलग खेळावे लागणार
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होता. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळं रिझर्व डेला, म्हणजे काल सामना खेळविण्यात आला. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. वेळापत्रकानुसार आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना आहे. त्यामुळं आज भारताला सलग तिस-या दिवशी मैदानावर घाम गाळावा लागणार आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दासून शनाका श्रीलंकेचं तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
आकडेवारी काय सांगते?
श्रीलंका आणि भारत यांच्यातील अजूनपर्यंतचा इतिहास पाहता, दोन्ही संघात एकूण 165 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 165 पैकी 96 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामन्यात विजय मिळवला आहे. 1 सामना अनिर्णित राहिला आहे. तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाहीये. त्यामुळं आज कोण जिंकून अंतिम फेरी गाठणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
भारतीय संभाव्य संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.
श्रीलंका संभाव्य संघ
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.