भारत आणि श्रीलंका आमनेसामने(फोटो-सोशल मीडिया)
ICC Women World Cup 2025 : आजपासून (३० सप्टेंबर) आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिलं सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. सामान्याआधी श्रीलंकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीकहा निर्णय घेतला आहे, तर भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४७ ओव्हरचा करण्यात आला आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत पदार्पणवीर अमनजोत कौर आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर ८ विकेट्स गमावून २६९ धावा केल्या आहेत. श्रीलंकाला विजयासाठी २७० धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात श्रीलंकन महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला. आणि भारत यांच्या प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने डावाची सुरवात केली.भारताची सुरवात चांगली झाली नाही. भारताची भरवशाची फलंदाज स्मृती मानधना चौथ्या ओव्हरमध्ये १४ धावा करून माघारी परतली. त्यानंतर प्रतिका रावल(३७) आणि हरलीन देओल(४८) यांनी ६७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर या दोघी बाद झाल्या आणि भारताच्या डावाला खिंडार पडले. भारतीय संघाच्या विकेट्स पडत राहिल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौर २१ धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज भोपळा न फोडता माघारी गेली. त्यानंतर रिचा घोष २ धावा करून बाद झाली. त्यानंतर मात्र दीप्ती शर्मा आणि पदार्पणवीर अमनजोत कौर यांनी महत्वपूर्ण १०३ धावांची भागीदारी रचत भारताला मजबूत स्थिती आणले. अमनजोत कौरने ५६ चेंडूत ५७ धावा करून बाद झाली. त्यामध्ये तिने ५ चौकार आणि १ षटकार मारला. तर दीप्ती शर्माने ५३ धावा करून ती डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. तिने ५३ चेंडूत ५३ धावा केल्या आहेत. त्यात तिने ३ चौकार मारले. तर स्नेह राणा १५ चेंडूत २८ धावा करून नाबाद राहिली. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनीने २ विकेट्स घेतल्या. तसेच अचीनी कुलसूरिया आणि चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन : चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रणवीरा.