भारताचा थेट अंतिम फेरीत प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात भारताकडून मिळालेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली झुंज दिली. मात्र हा सामना त्यांच्या हातातून निसटला आणि भारताने फायनलमध्ये प्रवेश केला. बुमराहने तन्झिद हसनला बाद करत पहिली विकेट काढली होती तर कुलदीप यादवने परवेझ हुसेन इमॉनला बाद केले आणि बांगलादेशला दुसरा धक्का बसला.
केवळ एका बाजूने सैफने लढा दिला. मात्र बांगलादेशच्या खेळाडूंची अन्य फळी एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतली आणि भारताने या सामन्यावर विजय मिळवला. या सामन्यात भारताची फिल्डिंग मात्र वाईट झाली, कारण अनेक कॅच सुटले अन्यथा बांगलादेशला काही धावांमध्येच भारत गुंडाळू शकला असता.
अभिषेक शर्माची झंझावाती खेळी
त्याआधी, भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. अभिषेक शर्मा वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशा केली. पॉवरप्लेमध्ये भारताने ७२ धावा केल्या होत्या. भारत २२०-२३० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु बांगलादेशने नियमित अंतराने विकेट्स घेत धावगती रोखली.
भारताकडून अभिषेकने ३७ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह ७५ धावा केल्या. हार्दिक पंड्यानेही २९ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. कर्णधार सूर्याने ५, शिवम दुबेने २ आणि तिलक वर्मा यांनी ५ धावा केल्या. अक्षर पटेल १५ चेंडूत १० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने ३ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले.
बांगलादेशाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र १६८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी जीवाची बाजी लावली. इतकंच नाही तर भारताच्या खराब फिल्डिंगमुळे त्यांना कितीतरी वेळा संधीदेखील मिळाली. पण तरीही बांगलादेश हा सामना जिंकू शकला नाही. बांगलादेशने या सामन्यात चार बदल केले, तर भारताने कोणताही बदल केला नव्हता. जर टीम इंडियाने आज बांगलादेशला हरवले असून आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत आणि श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
सैफ हसनने अर्धशतक केले. त्याने फक्त ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशसाठी हा एक महत्त्वाचा सामना होता आणि सैफने अपवादात्मकपणे चांगली फलंदाजी केली. त्याने एका टोकापासून धावसंख्या पुढे नेत ठेवली आणि षटकार मारून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र दुसऱ्या बाजूला एक एक खेळाडू आऊट होत गेला. कुलदीपने १६ रन्स देऊन ३ विकेट्स काढल्या, मात्र त्याची हॅटट्रिक हुकली.
IND VS BAN : भारताचा विजयी रथ रोखणार? बांगलादेशचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय…
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
बांग्लादेशची प्लेइंग इलेव्हन: सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, झाकेर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान.