फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज आशिया कप 2025 चा सुपर 4 चा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारताच्या संघाने झालेल्या साखळी सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभुत करुन सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. सुर्यकुमार यादवची सामन्याआधी पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्याने पाकिस्तानच्या संघाला चॅलेंज केले आहे. २१ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना सुपर ४ चा भाग आहे.
भारत आणि पाकिस्तान यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी आमनेसामने आले होते, ज्यात त्यांनी पाकिस्तानला सात विकेट्सने हरवले होते. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला आहे. आता, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी, सूर्यकुमार यादवने सामन्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.
SL vs BAN : वडिलांच्या निधनानंतर श्रीलंकेचा खेळाडू संघात परतल्यानंतर टीमने वाहिली श्रद्धांजली!
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दलच्या त्याच्या वचनबद्धतेबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “जर आपण प्रतिस्पर्ध्याबद्दल बोललो तर मला माहित नाही की तुम्ही कोणत्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलत आहात. मला वाटते की स्टेडियम भरलेले आहे आणि जेव्हा स्टेडियम भरलेले असते तेव्हा मी माझ्या संघाला आणि सर्वांना सांगतो की मनोरंजनाची वेळ आली आहे आणि लोक सामना पाहण्यासाठी आले आहेत, म्हणून तुम्हाला मनोरंजन करावे लागेल आणि सर्वांचे मनोरंजन करावे लागेल काही चांगले क्रिकेट खेळूण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
दबावाबद्दल बोलताना तो म्हणाला, “तुमची खोली बंद करा, तुमचा फोन बंद करा आणि झोपा. मला वाटते की ही सर्वात चांगली गोष्ट आहे. हे सांगणे सोपे आहे, परंतु कधीकधी ते कठीण असते कारण तुम्हाला खूप मित्र भेटतात, तुम्ही बाहेर जेवायला जाता आणि तुमचे बरेच खेळाडू असतात ज्यांना हे सर्व पाहणे आवडते, म्हणून ते खूप कठीण आहे.”
Once again suryakumar Yadav own Pakistan in press conference.😭🔥
“I don’t know what rivalry you’re talking about. For me, once I step onto the ground and see it full, I just tell my players it’s time to entertain everyone. We just focus on playing good cricket. We’ve played… pic.twitter.com/MCSC7hjCWC
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 20, 2025
रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील अशी आशा सूर्याने व्यक्त केली. शिवाय, भारतीय संघाला राष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा आहे हेही त्यांनी मान्य केले. “आम्ही चांगल्या हेतूने खेळण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.”
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.