भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना (फोटो- ट्विटर)
गेले दोन दिवस भारत विरुद्ध श्रीलंका सामना सकाळी 10 वाजता सुरू होत असे. तर उद्याचा दिवस भारत अन् श्रीलंका कसोटी सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ थोडा लवकर सुरू होणार आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशी सामना सकाळी ९:४५ वाजता (नेहमीच्या वेळेपेक्षा १५ मिनिटे आधी) सुरू होईल. दुसऱ्या दिवशी पावसामुळे वाया गेलेल्या ओव्हर्सची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Stumps, Day 2: A thoroughly dominant day comes to an end as #TeamIndia take two quick wickets to reduce Sri Lanka to 8-2 after declaring at 503-9. Earlier, Dhruv Jurel registered his 2nd Test ton. Details – https://t.co/r9FgXSdsMf #TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/hTKl01SJ3X — BCCI (@BCCI) August 24, 2026
पहिल्या डावात भारतीय संघाने 503 केल्या आणि आपला डाव घोषित केला. देवदत्त पडीकलने 117 रन्सची तर ध्रुव जुरेलने 115 रन्सची शतकी खेळी केली आहे. तर कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंतने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने 503 रन्सचा डोंगर उभा केला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीचा दुसरा आज खेळला गेला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलने आपले दुसरे कसोटी शतक झळकावले आणि याशिवाय देवदत्त पडिक्कलने देखील शतक झळकवत भारताला फलकावर योग्य धावा आणून दिल्या. श्रीलंका पहिल्या डावात मैदानावर खेळायला उतरल्यानंतर केवळ ८ धावांमध्ये २ विकेट गमावून बसली आहे.






