नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन(फोटो-सोशल मीडिया)
Nitish Rana becomes father of twins : कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि सध्या राजस्थान रॉयल्सचा डॅशिंग फलंदाज नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन झाला आहे. त्याने सोमवारी स्वत: ही आनंदाची बातमी सांगितली आहे. भारतीय क्रिकेटपटू नितीश राणाच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते खूप खुश असल्याचे दिसत आहेत.
नितीश राणा हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता. त्याच्या पत्नीचे नाव सची मारवाह असे आहे. तुम्हाला सांगतो की सची मारवाह ही प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची भाची आहे. नितीश राणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुलांच्या हातांचा फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे. आता लोक सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सची आणि राणाने फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाच्या बसमध्ये Rohit Sharma च्या सीटवर कुणाचे राज्य? कुलदीप यादवने केला मोठा खुलासा..
स्टार क्रिकेटर नितीश राणाच्या पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिल आहे. राणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “टॅटूपासून जुळ्या मुलांपर्यंत – आमच्यासाठी कथेत एक ट्विस्ट जो आम्हाला अपेक्षित नव्हता. त्याच तारखेला (१४.०६.२५) आम्हीही. फक्त दोन लहान माणसे सामील झाली.”
नीतीश राणाने केलेल्या पोस्टवर राजस्थान रॉयल्सने लिहिले की “अभिनंदन नितीश राणा. आम्ही लगेचच लहान जर्सी पाठवत आहोत.” त्याच वेळी, ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतने देखील लिहिले की, “आमच्या आनंदाच्या छोट्या गठ्ठ्याच्या आगमनाबद्दल अभिनंदन. मी वचन देते की मी प्रत्येक मुलाच्या स्वप्नांसारखी मामी बनेन.”
क्रिकेट जगतात, नितीश राणा आणि सची मारवाहची प्रेमकहाणी खूप खास अशी मानली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही पहिल्यांदाच एका डावात दरम्यान भेटले. जिथे नितीश राणा पहिल्या नजरेतच क्लीन बोल्ड झाला होता. त्यानंतर, दोघेही एकमेकांना भेटू लागले, डेट करू लागले. नंतर त्यांची मैत्री झाली आणि काही काळानंतर त्यांनी लग्न देखील केले.
हेही वाचा : ENG vs IND : ‘आनंदी, सुरक्षित अशी संस्कृती निर्माण करू..’, भारताच्या नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलचा दावा..
मैत्रीचे रूपांतर नत्र प्रेमात झाला आणि नंतर नितीश राणा आणि सची मारवाह यांनी २०१९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल सामन्यांदरम्यान, जेव्हा जेव्हा नितीश राणा मैदानावर फलंदाजीसाठी येतो तेव्हा सची स्टँडमध्ये त्याला पाठिंबा देताना दिसत असते.