फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Report : आज एकाना स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना पार पडला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी कमालीची सुरुवात केली. आज लखनौच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट्सने पराभूत केले. या चेन्नई सुपर किंग्सचा सीझनचा दुसरा विजय आहे सातत्याने झालेल्या पराभवानंतर संघाला या स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंतने अर्धशतक झळकावले पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही.
चेन्नईच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागेवर शेख रशीद याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याला आज प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले होते. आज शेख राशिदने लखनौ सुपर जायंट्सच्या संघासमोर १९ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार मारले. रचिन रवींद्र आज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. पण त्याने आज संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. रवींद्रने २२ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या यामध्ये त्याने ५ चौकार मारले. राहुल त्रिपाठीचा फ्लॉप शो सुरुच आहे.
🦁💛🥳#LSGvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/j93g9U2StB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2025
रवींद्र जडेजाने आज कमालीची फलंदाजी केली पण आज तो फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने ११ चेंडू खेळले आणि रवी बिष्णोईने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. विजय शंकर आजच्या सामन्यात फेल ठरला. संघाचे पाच विकेट गेल्यानंतर एमएस धोनी आणि शिवम दुबेने संघाची कमान सांभाळली. आजच्या सामन्यात शिवम दुबेने संघासाठी ३७ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर धोनीने संघासाठी महत्वाच्या ११ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ४ चौकार मारले.
IPL 2025 मधून अॅडम झाम्पा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर! या तरुण खेळाडूला मिळाले संघात स्थान
लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मिचेल मार्शने संघासाठी २५ चेंडूंमध्ये २० धावा केल्या यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. संघाचा कर्णधार रिषभ पंतने आज त्याचे या सीझनचे पहिले अर्धशतक झळकावले. पंतने ४९ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
चेन्नइ सुपर किंग्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रवींद्र जडेजाने २ विकेट्स घेतले तर मथीशा पाथिराणा याने सुद्धा संघासाठी २ विकेट्स घेतले. त्याचबरोबर खलील अहमद आणि अंशुल कम्बोज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. लखनौसाठी रवी बिष्णोईने २ विकेट्स घेतले, त्यानंतर एडन मार्करम, दिग्वेश राठी आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.