फोटो सौजन्य - YouTube
कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे आशियाई शूटींग चॅम्पियनशिप 2025 सध्या सुरु आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. भारताच्या शूटर्सने या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या अनंतजीत सिंग नारुकाने पुरुषांच्या स्कीट फायनलमध्ये कुवेतचा दिग्गज नेमबाज आणि माजी आशियाई क्रीडा विजेता मन्सूर अल रशिदीचा पराभव करून भारतासाठी आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून तिरंगा कझाकस्तानमध्ये झळकावला आहे. त्याच वेळी, सौरभ चौधरी आणि सुरुची इंदर सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारताच्या किट्टीत आणखी एक पदक जोडले.
त्याचबरोबर आशियाई शूटींग चॅम्पियनशिप 2025 मध्ये, मनू भाकरने महिला गटातही कांस्यपदक जिंकले आहे, ज्यामुळे भारताची कामगिरी आणखी मजबूत दिसते. पुरुषांच्या स्कीट फायनलमध्ये, भारतीय नेमबाज अनंतजीत सिंग नारुकाने कुवेतच्या मन्सूर अल रशिदीला अतिशय रोमांचक सामन्यात हरवून आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. नारुकाने अंतिम फेरीत ५७-५६ असा विजय मिळवला. पात्रता फेरीत नारुका ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता, तर अल रशिदी तिसऱ्या स्थानावर होता.
ANANT JEET SINGH NARUKA IS THE ASIAN CHAMPION
A brilliant shooting by Anant Jeet Singh as he shot 57/60 in the finals of the men’s skeet to win the gold medal at the Asian Shooting Championships
A great shot by Anant. He also won the 1st ever gold for India in the Sr… pic.twitter.com/OOr2iXLXpn
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) August 20, 2025
या विजयासह, या चॅम्पियनशिपमधील नारुकाचे हे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे, तर एकूणच हे त्याचे पाचवे खंडीय पदक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या नारुकाच्या या कामगिरीने भारताच्या आशा आणखी बळकट केल्या आहेत आणि हे सुवर्ण त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक मानले जात आहे.
भारतीय नेमबाज सौरभ चौधरी आणि सुरुची इंदर सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय जोडीने चिनी तैपेई जोडी लिऊ हेंग यू आणि ह्सीह सियांग यांचा १७-९ असा पराभव केला. पात्रता फेरीत ही भारतीय जोडी पाचव्या स्थानावर होती आणि त्यांचा एकूण गुण ७५८ होता. तथापि, निर्णायक सामन्यात त्यांनी त्यांच्या खेळाची पातळी वाढवली आणि विजय मिळवला. चीनने दक्षिण कोरियाचा १६-१२ असा पराभव करून या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.
यापूर्वी, भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाला अभिमान वाटला. सलग अनेक स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी हे सिद्ध करत आहे की भारत आता आशियाई पातळीवर एक प्रमुख शक्ती बनला आहे. श्यामकेंटमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा भारतीय नेमबाजांसाठी खूप खास ठरत आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२८ च्या तयारीच्या दृष्टीने नारुकाचे ऐतिहासिक सुवर्ण आणि इतर खेळाडूंच्या कामगिरी देखील भारतासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.