पीएसएल २०२५(फोटो-सोशल मीडिया)
Indo pak war : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानला त्याची पात्रता दाखवली जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा : KKR vs CSK: ‘योग्य वेळ आल्यावरच..’, सीएसकेचा कर्णधार MS Dhoni चे पुन्हा एकदा निवृत्तीवर भाष्य..
पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या पीएसएलच्या १० व्या हंगामातील अजूनही ८ सामने बाकी आहेत. ज्यामध्ये चार लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने समाविष्ट आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे पीसीबीची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे बोर्डाकडून ही स्पर्धा यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीसीबीकडून हा निर्णय घेण्यासाठी अनिष्ट परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. पीसीबीने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्ययकी केली आहे. त्यामुळे गुरुवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक घेऊन या बैठकीत पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासह परदेशी खेळाडू देखील उपस्थित होते. कारण परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर पाकिस्तान सोडायचे आहे.
पीएसएल 2025 चे चार लीग सामने आणि प्लेऑफ मूळतः रावळपिंडी, मुलतान आणि लाहोर येथे आयोजित करण्यात आले होते. तथापि, स्टेडियमवर ड्रोन हल्ल्याच्या वृत्तानंतर ८ मे रोजी रावळपिंडी येथे खेळला जाणारा सामना पुढे ढकलण्यात आला. पण गुरुवारी भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला आणि त्यानंतर पीएसएल दुबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच दुसरीकडे, आयपीएल २०२५ देखील धोक्याच्या सावटाखाली आहे. जरी, आतापर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्ताच्या सर्व हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले असले तरी खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून, ८ मे रोजी धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द केला होता. त्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले होते.