IPL सामन्यादरम्यान घाबरलेल्या चीअरलीडरचा थरारक अनुभव(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण असे आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. यामुळेच काल (८ मे) धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. इशारा मिळाल्यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षकांना स्टेडियममधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यादरम्यान एका चीअरलीडरने लोकांना तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, चीअरलीडर असे म्हणताना ऐकू येते की, ‘खेळाच्या मध्यभागी संपूर्ण स्टेडियम रिकामे केले आहे. हे खूपच भयानक असे दृश्य होते. सगळे फक्त ओरडत होते की बॉम्ब येत आहेत. ते अजूनही खूप भीतीदायक वाटत होते. खरंच आपल्याला धर्मशाळेबाहेर जायचे आहे. मला पूर्ण आशा आहे की आयपीएलचे लोक आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतील. हे सगळं खरंतर खूप भीतीदायक आहे. मी का रडत आहे हे मला माहित नाही. मला वाटतंय मी अजून देखील धक्क्यात आहे. मला माहित नाही काय चाललंय.’
हेही वाचा : IPL suspended: IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय…
“Very very scary” – Cheer leader’s SHOCKING video from Punjab Kings Vs Delhi Capitals IPL match in Dharamshala. pic.twitter.com/S830aDKer3
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 8, 2025
या घटनेनंतर, बीसीसीआयकडून खेळाडूंना सुरक्षितपणे दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्ट टीमलाही या ट्रेनने राजधानीत आणले जाणार आगहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मशाळेत अडकलेल्या सर्व खेळाडूंना प्रथम उना येथे पाठवण्यात येईल. त्यानंतर, उना येथील सर्व खेळाडू एका विशेष ट्रेनने राजधानी दिल्लीला जातील.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.