फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांची मोठे वक्तव्य : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मोठा फेरबदल झाला. भारतीय क्रिकेट खेळाडूंवर त्याचबरोबर परदेशी खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी करोडोंची बोली लावली. यावेळी रिषभ पंत, युझवेन्द्र चहल, श्रेयस अय्यर, अर्शदिप सिंह यासारख्या खेळाडूंवर आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये पैशांची उधळण झाली. आता अनेक संघाचे आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघाचे कॅप्टन बदलले दिसणार आहेत. आता यावर आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
कहर! 4,4,4,4,4,4, नारायण जगदीसनने एका षटकात ठोकले चौकार, नवा विक्रम VIDEO व्हायरल
आयपीएल मेगा लिलाव २०२५ पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला सोडले होते. त्यानंतर आता आरसीबी आयपीएल २०२५ मध्ये नव्या कर्णधारासह खेळणार आहे. मात्र, फ्रँचायझीने अद्याप संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे कर्णधारपद भूषवू शकतो, अशी बरीच अटकळ बांधली जात असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता संघाच्या नवीन कर्णधाराबाबत मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
स्पोर्ट्स टाकशी बोलताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले, “तुम्हाला निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही एका नवीन युगात प्रवेश करत आहोत, तीन वर्षांच्या चक्राची सुरुवात आणि मला खात्री आहे की अपेक्षा तुमच्यासाठी चांगली असेल. तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा तुम्ही मला विचारू शकता, परंतु अद्याप असा कोणताही संवाद झालेला नाही.” म्हणजेच पुढील मोसमात आरसीबीचा नवा कर्णधार कोण असेल, हे फ्रँचायझींनी अद्याप ठरवलेले नाही?
Andy Flower said – “Virat Kohli played a very instrumental part of RCB’s comeback in second half in IPL 2024. He was brilliant when he spoke, he was very calm, He was always energetic and his presence was very powerful and motivated players. And he played brilliantly as well”. pic.twitter.com/CONmmMdygX
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 10, 2025
आरसीबीकडे विराट कोहली आधीच आहे. याशिवाय आरसीबीने या मेगा ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या या अनुभवी खेळाडूंनाही विकत घेतले आहे. भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. तर कृणाल पंड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. आता पाहायचे आहे की आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचा नवा कर्णधार कोण असेल?
यावेळी मेगा लिलावात आरसीबीने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्टलाही विकत घेतले आहे. फिल सॉल्टसाठी शेवटचा हंगाम खूप चांगला होता आणि त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी अप्रतिम कामगिरी केली. आयपीएल २०२४ मध्ये सॉल्ट केकेआरसाठी ओपन करताना दिसला होता, त्यामुळे आता फिल सॉल्ट विराट कोहलीसह आरसीबीसाठी ओपनिंग करेल.