फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया
आयपीएल 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीझनचा मेगा ऑक्शनसाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. आता आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरू होण्यासाठी सुमारे 24 तासाहून कमी तास उरले आहेत. यापूर्वी मेगा लिलावाच्या सुरुवातीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयपीएल २०२५ चा हा लिलाव अधिक मनोरंजक होणार आहे. अनेक संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मोठ्या क्रिकेट खेळाडूंची नावे आहेत यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार रिषभ पंत आणि आयपीएल २०२४ चे विजेत्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांना संघानी रिलीज केले आहे. त्याआधी इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीझनचा मेगा ऑक्शनच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे, जाणून घ्या मेगा लिलाव कोणत्या वेळी सुरू होणार आहे.
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार आता मेगा लिलाव दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. यापूर्वी लिलावाची वेळ दुपारी ३ वाजता होती. म्हणजेच आता 30 मिनिटे उशिरा लिलाव सुरू होणार आहे. मेगा लिलाव दोन दिवस चालणार आहे. दोन्ही दिवशी दुपारी साडेतीन वाजता लिलाव सुरू होणार असून रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालणार आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यामुळे लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी असे मानले जात होते की कसोटी सामना भारतीय वेळेनुसार 2:50 वाजता संपेल, परंतु पहिल्या दिवशी (22 नोव्हेंबर) तसे झाले नाही. अशा स्थितीत लिलाव आता ३० मिनिटे उशिराने सुरू होणार आहे.
आयपीएल २०२५ च्या लिलावात एकूण ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार असल्याची माहिती यापूर्वी आली होती. परंतु, आता त्यात नव्या नावाची भर पडली आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही आयपीएल २०२५ च्या लिलावात भाग घेतला आहे. या मेगा लिलावात ८१ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये असणार आहे, तर २७ खेळाडूंची मूळ किंमत १.५० कोटी रुपये आहे. त्याच वेळी, या यादीत १८ खेळाडू आहेत, ज्यांची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा लिलावाचे आयोजन सौदी अरेबिया करण्यात आले आहे. हा लिलाव सौदी अरेबियाच्या वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या वेळेनुसार भारतीय क्रिकेट प्रेक्षकांना दुपारी साडेतीन वाजल्यापासून मेगा लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. दोन दिवस या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर, म्हणजेच लिलावाच्या दोन्ही दिवसांची वेळ सारखीच आहे. या लिलावाचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. मोबाइलवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी लिलावाची लाईव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर पाहता येणार आहे.