फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सध्या दुसरी इनिंग सुरु आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने संघासाठी फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या संघ पहिल्या इनिंगमध्ये फक्त १५० धावा करून सर्वबाद झाला. भारताचा गोलंदाजांनी टीम इंडियाचा खेळ संभाळल्यामुळे भारताचा संघासमोर आता ३८ ओव्हरनंतर टीम इंडियाकडे १४७ धावांची आघाडी आहे. आजच्या भारतीय संघाच्या गोलंजीबद्दल बोलायचं झालं तर संघाने आज कमालीची कामगिरी पहिल्या चेंडूपासून केली आहे. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी पहिल्याच त्याच्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सध्या भारताचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने अर्धशतक नावावर केले आहे. यशस्वी जयस्वालने १२४ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. तर भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने १०७ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. यशस्वी जैस्वालनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताची आघाडी 150 च्या जवळ आहे.
𝐅𝐈𝐅𝐓𝐘
Maiden Test 50 for @ybj_19 on Australian soil. He brings up the half century in 123 balls! His opening stand with @klrahul is now worth 100 runs.
India lead by 146 runs.
Live – https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/9GMd1q1vUq
— BCCI (@BCCI) November 23, 2024
भारताच्या संघासाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल दोघेही मजबूत उभे आहेत. भारताच्या संघाने आतापर्यत ४६ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६० धावांची आघाडी घेतली आहे. दोन्ही फलंदाजांनी शतकीय भागीदारी केली आहे. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये लवकर विकेट गमावले होते त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली तर दुसरीकडे दुसऱ्या इनींगमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज विकेट घेऊ शकला नाही.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जैस्वालला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. जयस्वाल आठ चेंडू खेळूनही धावा न करता बाद झाला. स्टार्कनेच त्याची विकेट घेतली, पण जैस्वालने पहिल्या डावात केलेल्या चुकातून शिकून दुसऱ्या डावात त्यात सुधारणा करत ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना या युवा फलंदाजाला अडचणीत आणता आले नाही. यशस्वीने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.
भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने 5 बळी घेतले, तर हर्षित राणाने तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजबे संघासाठी दोन विकेट घेतले. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या हाती एकही विकेट लागली नाही.
भारताच्या संघाने रोहित शर्माच्या अनुपस्थित कमालीची कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने जिंकणे महत्वाचे आहे.